RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) वैभव सूर्यवंशीने शतकी खेळी करत अनेक विक्रम केले. मात्र असे असले, तरी त्याला अचानक मैदानातून बाहेर जावे लागल्याने राजस्थानची चिंता वाढली आहे. शनिवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना झाला. या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या (Vaibhav Sooryavanshi Century) जोरावर राजस्थानने हैदराबादसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा उतरले. पण हेड पहिल्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. मात्र नंतर अभिषेक शर्मा ईशान किशनच्या साथीने डाव सावरत होता.
Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलंयावेळी जोफ्रा आर्चरने टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ईशन किशनने कव्हरच्या दिशेने जोरात शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेला वैभव चेंडूला सीमापार होण्यापासून रोखण्यासाठी पळाला.
मात्र याच दरम्यान, त्याच्या उजव्या पायात कळ आल्याचे दिसले. त्यामुळे फिजिओ लगेचच मैदानात आले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र वैभवला उभं राहतानाही त्रास होत होता. त्यामुळे तो त्यांच्यासोबत आधार घेत मैदानातून बाहेर गेला.
वैभवची दुखापत हॅमस्ट्रिंगची असल्याची शक्यता सध्या व्यक्त होत आहे. राजस्थानने अद्याप त्याच्या दुखापतीवर महिती दिलेली नाही. पण आता राजस्थानला अशीच आशा असेल की त्याची दुखापत गंभीर नसावी आणि तो संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असावा. कारण यापूर्वीही अशाप्रकारे हॅमस्ट्रिंगच्या दुखपतीने चेन्नई सुपर किंग्सचा आयुष म्हात्रे हंगामातून बाहेर झाला आहे, तर रोहित शर्माही मुंबईसाठी गेल्या दोन सामन्यात खेळला नव्हता.
भारतात सध्या उन्हाळा सुरू असून त्याचाच परिणाम खेळाडूंवर होत असल्याचेही म्हटले जात आहे. सामन्यानंतर वैभव हैदराबादच्या खेळाडूंसोबत गप्पा मारताना दिसला. त्यामुळे त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याची शक्यता आहे.
दरम्यान, वैभवने या सामन्यात अवघ्या ३६ चेंडूत शतक केले होते. त्यामुळे तो आयपीएलमध्ये ४० चेंडूंच्या आत दोन शतके करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने गेल्यावर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक केले होते. वैभवने या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. त्याने ध्रुव जुरेलसह ११६ धावांची भागीदारी केली. जुरेलने ५१ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने २० षटकात २२८ धावा केल्या.
IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथवैभव राजस्थानचा आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. त्याने २ अर्धशतके आणि एका शतकासह ३५७ धावा या हंगामात केल्या आहेत.
दरम्यान, राजस्थानने दिलेले २२९ धावांचे लक्ष्य हैदराबादने १८.३ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.