Solapur Crime : दमून भागून झोपला तरूण, अचानक लागला पाय.. रात्रीच्या अंधारात सोलापूरमध्ये जे घडलं..
Tv9 Marathi April 27, 2026 02:45 PM

राज्यातील गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलं असून त्यामुळे कायदा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होताना दिसतो. सोलापुरात तर शुल्लक कारणावरून असं काही घडल की अख्खं शहर हादरलं असून सर्वांच्याच मनात दहशत पसरली आहे. सोलापूरच्या मीनाक्षी नगर येथे एका तरूणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची भयानक घटना घडली आहे. रस्त्यावरील मोकळ्या जागेत झोपलं असताना तरूणाचा पाय लागला आणि त्यावरून झालेल्या वादावादीत आयुष्यचं गमवावं लागलं. महेश सावळतोटे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सोमनाथ जवळकोटे असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी सोमनाथविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेडया ठोकून ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र भररात्री झालेल्या या खुनामुळे अख्ख शहर आणि नागरिक मात्र चांगलेच दहशतीत आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील मीनाक्षी नगरमध्ये हा खून झाला. तेथे तेलगू शाळेजवळील असलेल्या मोकळ्या जागेत महेश हा मध्यरात्री झोपला होता. बाजूलाच आरोपी सोमनाथही आडवा झाला होता. मात्र झोपेत असताना सोमनाथ याचा पाय अचनाक महेशला लागला. त्यामुळे त्याला जाग आली आणि त्याने सोमनाथला जाब विचारला.

याच मुद्यावरून महेश आणि सोमनाथ यांच्यात शिवीगाळ करत वाद झाला. दोघांमध्ये याच शुल्लक कारणावरून भांडण सुरू झालं आणि बघता बघता हा वाद प्रचंड पेटला. आणि भाडता भाडता रागाच्या बरात सोमनाथ याने महेशच्या डोक्यात दगड घातला. या भीषण हल्ल्यामुळे महेश गंभीर जखमी झाला आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. थोड्याच वेळात महेश याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्तळी धाव घेत पंचनामा करून महेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर आरोपी सोमनाथ याला बेड्या ठोकून ताब्यात घेतलं. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.