Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान एका महिला पत्रकारावर जोरदार टीका करताना लाज सुद्धा काढली. ही घटना हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराचा आरोप असलेल्या कोल थॉमस ॲलनच्या संदेशांशी संबंधित होती. ॲलनने हल्ल्याच्या 10 मिनिटे आधी आपल्या कुटुंबाला एक जाहीरनामा पाठवला होता. त्यात त्याने 'बाललैंगिक शोषक, अत्याचारी आणि देशद्रोही' यांसारखे शब्द वापरले होते, परंतु कोणाचेही नाव थेट घेतले नव्हते. या संदर्भात, महिला पत्रकार नोरा ओ'डोनेल यांनी ट्रम्प यांना विचारले की हे आरोप त्यांच्यावरच होते का?
ट्रम्प यांनी उत्तर दिले, "मी अत्याचारी नाही आणि मी कोणावरही अत्याचार केलेला नाही." त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटले, "तुम्ही टीव्हीवर एका विकृत माणसाची बकवास वाचली आहे. ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही, त्यांच्याशी मला जोडले जात आहे. मला आधीच पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे." नोरा यांनी स्पष्ट केले की ते त्यांचे स्वतःचे शब्द नव्हते, तर आरोप करणाऱ्याचे होते. तथापि, ट्रम्प म्हणाले की टीव्हीवर असे आरोप वाचणे चुकीचे आहे.
.@POTUS SLAMS @60Minutes: "You should be ashamed of yourself, reading that — because I'm not any of those things." pic.twitter.com/QWxqoUFUaF
— Rapid Response 47 (@RapidResponse47) April 26, 2026
एका मुलाखतीत ट्रम्प यांना विचारण्यात आले की ते स्वतः लक्ष्य होते का? तेव्हा ते म्हणाले की त्यांना खात्री नाही. त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेदरम्यान त्यांना भीती वाटली नाही, कारण जग असेच आहे आणि अशा गोष्टी घडू शकतात. ते म्हणाले की, सुरुवातीला त्यांना वाटले की ही एक किरकोळ घटना आहे, पण नंतर त्यांना जाणवले की ती गंभीर आहे. त्यावेळी एक कलाकार कार्यक्रम सादर करत होता आणि वातावरण सामान्य वाटत होते, पण अचानक सर्व काही बदलले. ट्रम्प म्हणाले की, सुरक्षा पथकाला त्यांना ताबडतोब बाहेर काढायचे होते, पण आधी काय घडत आहे हे त्यांना पाहायचे होते. नंतर, जेव्हा एजंट्सनी त्यांना खाली बसायला सांगितले, तेव्हा मी आणि मेलानिया दोघेही जमिनीवर झोपलो आणि नंतर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्यांनी स्पष्ट केले की, ते अर्धे उभा होतो, नंतर धोका जास्त असल्याने एजंट्सच्या सांगण्यावरून खाली बसले. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही अशा परिस्थिती पाहिल्या आहेत. मेलानियासाठी हा एक नवीन अनुभव असला तरी, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली.
मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, ही घटना वाईट होती, पण त्यात कोणीही ठार किंवा जखमी झाले नसल्यामुळे प्रकरण वाढले नाही. अशी हिंसा काही नवीन नाही. हे 20,50, 100 किंवा 500 वर्षांपासून घडत आले आहे. यात लोक मारले जातात आणि जखमी होतात. आजकाल हे अधिक वेळा घडत आहे, असे वाटत नाही. राजकीय हिंसाचार भडकवण्यासाठी त्यांनी डेमोक्रॅटिक नेत्यांच्या 'द्वेषपूर्ण भाषणाला' जबाबदार धरले आणि ही एक अत्यंत धोकादायक परिस्थिती असल्याचे म्हटले.
आरोपीने आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, वरिष्ठ सरकारी नेते त्याचे लक्ष्य होते आणि त्याला त्यांना एकामागून एक लक्ष्य करायचे होते. त्याने लिहिले की, त्याला यापुढे कोणत्याही 'देशद्रोह्यांच्या' कारवायांमध्ये सहभागी व्हायचे नाही. मात्र, त्या हॉलपर्यंत आरोपी पोहोचला नाही जिथे ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा पथकाने त्याला वेळीच रोखले आणि ट्रम्प यांना तत्काळ घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण यापूर्वीही त्यांच्यावर हल्ला झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या