प्राजक्ता शुक्रेचं चाहत्यांना गोड सरप्राईज; पण, गूड न्यूज शेअर करताच होऊ लागलीय ट्रोल, नेमकं काय घडलं?
जयदीप मेढे April 27, 2026 03:13 PM

Prajakta shukre: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन नुकताच संपला. या पर्वातील सर्वच स्पर्धकांनी  प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या सहाव्या पर्वाची विजेती तन्वी कोलते ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कुठला स्पर्धक काय करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. दरम्यान आपल्या गोड आवाजाने आणि स्ट्रॉंग खेळामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी गायिका प्राजक्ता शुक्रे सध्या चर्चेत आहे तिच्या गोड सरप्राइजमुळे.  नुकतीच प्राजक्ता सुक्रेने तिच्या instagram अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमुळे प्राजक्ताला ट्रोल केलं जात आहे. अनेकांना तिच्या प्रोजेक्टविषयी उत्सुकता असली तरी तिच्या पोस्टरवरील एका गोष्टीमुळे चाहते भडकलेले दिसत आहेत. (Prajakta Shukre)

काय आहे प्राजक्ताचं सरप्राईज ?

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीजन मधून लोकप्रिय झालेल्या प्राजक्ता शुक्रे नेते instagram ला एक पोस्ट शेअर केलीये.यामुळे तिचे चाहते आणि समस्त शिवभक्तांची उत्सुकता ताणली आहे . प्राजक्ताने तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओच पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केलंय.म्युझिक व्हिडिओच नाव 'शिवबा मराठी मनात' असं आहे. तिने 'जागर येतोय मराठी मातीचा' असं कॅप्शन देत हे पोस्टर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये आणखी एका गोष्टीमुळे प्रेक्षकांना धक्का बसलाय. प्राजक्ताच्या या म्युझिक व्हिडिओमध्ये 'बिग बॉस मराठी 6 ' मधील रुचिता जामदारही दिसणार आहे. कपाळावर चंद्रकोर, हातात तलवार आणि नजरेतील धार  अशा वेषात ती या व्हिडिओमध्ये दिसणार आहे.  बिग बॉसच्या घरात 'भांडकुदळ '  अशी ही ओळख असणाऱ्या रुचिताला पाहून अनेकांनी प्राजक्ताला ट्रोल करायला सुरुवात केली. प्राजक्ता करत होती तोपर्यंत ठीक होतं, रुचिताला कशाला घेतलं ? असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय. या पोस्टर खाली आलेल्या अनेक कमेंट्स या नकारात्मकच असल्याचं दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Shukre (@prajaktashukre)

एका नेटकऱ्यांने लिहिलं ' महाराजांचे नाव घेऊन काहीतरी करायचं पाहत आहात तर जपून करा. कारण इथं महाराष्ट्र बिग बॉस आहे चुकीला माफी नाही ' असं एकाने म्हटलंय. अनेकांनी दोघींनाही शुभेच्छा दिल्याचेही दिसतंय. अनेकांनी 'रुचिताला आधी नीट बोलायला शिकव ' असं म्हटलं. किमान या व्हिडिओत तरी शिव्या देऊ नकोस असं म्हणत अनेकांनी रुचिताला ट्रोल केलंय. प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टनुसार या गाण्याची गायिका आणि संगीतकार स्वतः प्राजक्ता आहे .तर गाण्याचे बोल ज्ञानेश्वर पांचाळ यांनी लिहिले आहेत.तिच्या पोस्टरवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. हे गाणं 1 मे रोजी रिलीज होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.