आज काय केलं? फुस्सससस, फुस्सससस… गुणरत्न सदावर्तेंनी सरनाईकांसह राज ठाकरेंना डिवचलं
Tv9 Marathi April 27, 2026 11:45 PM

1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता. मात्र आता हा निर्णय तात्काळ लागू होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणि आवश्यक तयारी करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. म्हणजेच, 15 ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाणार नाही. अशातच आता या संपूर्ण प्रकारावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर भाष्य केले आहे. सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरेंना डिवचलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

परिवहन खातं आज पंक्चर झालं…

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, प्रथम देश ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात आणि कायद्यात आहे. आपण काय करतो याचं भान माणसाला राहत नाही तेव्हा अक्षम्य गोष्टी हातून होतात. त्यातली बाब म्हणजे सरनाईकांच्या विभागाने चूक करुन दाखवली. आम्ही साततत्याने म्हणत होतो तुम्हाला बंदी घालता येणार नाही. आज काय केलं, फुस्सससस, फुस्सससस. परिवहन खातं आज पंक्चर झालं का हा माझा प्रश्न आहे. राज ठाकरे सारख्या माणसाने काय केलं पाहा, सरनाईक तुम्ही रिस्पॉसेबल आहात. निरुपमला त्रास देणाऱ्या लोकांना बोलावून सत्कार केला.

राज ठाकरेंनाही डिवचलं…

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘मी राज ठाकरेंची निंदा करतो, निरुपमवर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार होत असेल तर प्रताप सरनाईकांची जबाबदारी काय? प्रताप सरनाईक तुम्ही काहीच करू शकणार नाही. कोणत्याही रिक्षावाल्याने आज घाबरण्याची गरज नाही. कुणाला त्रास झाला तर हेल्पलाईन नंबर आम्ही दिला आहे, त्यावर संपर्क करा. परिवहन विभागात जे काही पाहायला मिळालं अतिशय चुकीचं होतं. सरनाईक कॅन्सल म्हणायचे आणि मला ते कॅन्सर असं वाटायचं आज रिक्षावाला कष्टकरी जिंकलेला आहे.’

कायदाच नाही तर निर्णय कसा घेणार?

गुणरत्न सदावर्ते यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘कायदाच नाही तर सरनाईक कोणता आणि कसला निर्णय जाहीर करणार? प्रेस नोट काय कायदा आहे का?, परिवहन खात्याने सर्कुलर काढलं म्हणजे कायदा होत नाही, डंके की चोट पे सांगत आहे. या सगळ्या पादऱ्या गोष्टी होत्या, राज ठाकरे बिळातून निघाला आणि फणा काढणं सुरु झालं. यात एक महिला गहिवरुन गेलीय, मध्यरात्री अतिक्रमण होतंय. ती महिला नाव घेत आहे सरनाईकचं, काळ्या रंगाचा उल्लेख करतेय. अशा प्रकारचा कार्यक्रम चालत असेल तर अतिशय दुख:द आहे.’

मला धमकी दिली…

सदावर्ते यांनी पुढे म्हटले की, ‘भाईंदर पाडा येथील घटना आहे, सरनाईकांकडून आणि त्यांच्या गुंडाकडून जमिनी बळकवण्यात आली आहे. लोकं परेशान झाले आहेत. असा माणूस मी कधीही पाहिलेला नाही, आमदार मेहता यांनी प्रताप सरनाईक मंत्री राहू नये इथपर्यंत मागणी केली आहे. प्रताप सरनाईक यांची केस एका दक्षिणात्य मंत्र्याच्या सिमिलर केस आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन उच्च न्यायालयात जावं लागेल, मला धमकी दिली एका चॅनलवर. प्रताप सरनाईक माझा एक बाल बाका करु शकत नाही.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.