पुणे : शहरातील बुधवार पेठ (Pune) परिसरात कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेल्या न्यु वेलकम, बेगम, दाणे आळी येथील जुना वाडा या बिल्डींगमधील काही फ्लॅट सिल करण्यात आले आहेत. याप्रकरणी, भारतात अनाधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी पकडले. फरासखाना पोलीस स्टेशन (Police) येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध पोक्सो गुन्हा दाखल आहे. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत सदर दाखल गुन्ह्यामध्ये कुंटणखाना चालविणारे, तसेच जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांचा तपास करीत असतांना बिल्डींगमधील कुंटणखान्यासाठी (Prostitute) वापरलेले फ्लॅट सिल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण 4 फ्लॅट 1 वर्षाकरीता सीलबंद करण्यात आलेले आहे.
महिनाभरापूर्वी 3 बांग्लादेशी महिला अनाधिकृत विनापरवाना भारतात वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बुधवार पेठ येथील सार्वजनिक रोडवर छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाई बांगलादेशी महिला नामे 1) जोशना शकुर अली 2) कलसुम खातून आणि 3) अंजुरा बेगम सर्व (राहणार बांग्लादेश) मिळून आल्यानंतर, त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. सदर महिला भारतात अनाधिकृतपणे छुप्या पद्धतीने एक महिन्यापासून वास्तव्य करीत होत्या. विशेष म्हणजे, त्या बांगलादेशी महिला पुणे येथे वेश्या व्यवसाय करुन, स्वतः चा उदरनिर्वाह करीत असल्याबाबतची माहिती समोर आलेली आहे. पोलिसांना त्याच्याकडे बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या पुणे शहरात वास्तव्यास असलेले बांगलादेशी नागरिक शोधण्याचे काम सुरू आहे. बांगलादेशी महिला ज्या पुण्यात राहतात त्यांनाही शोधण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून काही बांगलादेशी महिलांना शोधून काढलं होतं. शहरातील काही भाग आहे, काही बिल्डिंग आहे, तिकडे या महिला ठेवण्यात येतात. आज चार कुंटणखाने सील केले आहेत, अशी माहिती झोन 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिली. एजंटांकडून इकडे महिलांना आणले जाते, काही एजंटवर कारवाईचे काम सुरू आहे. वेगवेगळ्या कारणाने बांगलादेशी इथ येत आहेत. गेल्या काही महिन्यात 40 पेक्षा जास्त बांगलादेशी पकडण्यात आले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने इथ येतात, त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. जे रॅकेट आहे, त्यावर कारवाई केली जात असल्याचंही रावले यांनी सांगितलं.