मुंबई : भारतात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. नोकरीच्या निमित्तानं ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येकाला छोटं का असेना आपलं घर असावं असं वाटतं. घरांच्या किमती अधिक असल्यानं बहुतांश लोक घर खरेदीवेळी बँकांकडून गृह कर्ज (Home Loan) घ्यावं लागतं. घर खरेदी करताना 20-30-40 चा फॉर्म्युला देखील लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
घर खरेदी करणं हा भावनिक आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. त्यामुळं घर खरेदी करताना तुम्ही तुम्हाला किती गृहकर्ज परवडेल याचा विचार करणं आवश्यक आहे. घर खरेदी करताना तुम्ही 20-30-40 फॉर्म्युला वापरल्यास त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. वस्तूनिष्ठपणे विचार करुन आर्थिक स्थिरतेचा विचार करुन गृह कर्जाच्या प्रकरणावर सही करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
20-30-40 चा फॉर्म्युल्यामुळं तुम्ही तुमचे गृहकर्ज तुमच्या उत्पन्नानुसार किफायतशीर पद्धतीनं घेऊ शकता. यातील 20 टक्के म्हणजे तुम्ही घर खरेदी करण्यासाठी घराच्या किमतीच्या 20 टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्या. तर, तर,30 टक्के म्हणजे तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 30 टक्के रकमेइतका ईएमआय असावा. 40 टक्के म्हणजे कर्ज आणि इतर देणी मासिक उत्पन्नाच्या 40 टक्के असावीत.
तुम्ही घर खरेदी करत असताना त्याच्या एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम डाऊनपेमेंट म्हणून जमा करा. यामुळं तुम्ही गृह कर्ज घेत असाल तर त्याची रक्कम कमी होते. कमी मुद्दल घेतल्यानं व्याज देखील कमी भरावं लागतं.
तुम्ही एखाद्या बँकेकडून गृहकर्ज घेत असाल तर त्या कर्जाचा हप्ता तुमच्या पगाराच्या रकमेच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक असून नये. यामुळं तुमच्यावर आर्थिक दबाव येणार नाही. तुम्हाला तुमचे मासिक खर्च भागवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 40 टक्के म्हणजे तुमच्या कर्जाचे हप्ते आणि इतर देणी पगाराच्या रकमेच्या 40 टक्क्यांपेक्षा अधिक असू नयेत. यामुळं तुम्ही कर्जात अधिक अडकणार नाही.
सुरक्षित मर्यादेत तुम्ही गृहकर्ज घेतल्यास तुम्ही हप्त्यांची परतफेड करत असताना गुंतवणूक सुरु ठेवून वेल्थ क्रिएशन देखील करु शकता.
हा फॉर्म्युला एक उदाहण घेऊन समजून घ्यायचं म्हटलं तर, तुमचा पगार जर 1 लाख रुपये असेल आणि तुम्ही खरेदी करत असलेल्या घराची किंमत 50 लाख रुपये असेल तर तुम्ही डाऊन पेमेंट म्हणून 10 लाख रुपये जमा करावेत. म्हणजे तुम्हाला 40 लाखांचं गृहकर्ज काढावं लागेल. त्याचनुसार 1 लाखांच्या 30 टक्के म्हणजे गृहकर्जाचा ईएमआय 30000 रुपयांपेक्षा अधिक असू नये. 40 टक्के म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा हप्ता आणि इतर कर्जांचा हप्ता मिळून ती रक्कम 40 हजार रुपयांची असू नये.
घर खरेदी करण्यासाठी 20-30-40 चा फॉर्म्युला वापरल्यास क्षमतेपेक्षा अधिक कर्ज काढावं लागणार नाही. तुम्ही 20 टक्के डाऊनपेमेंट केल्यास गृहकर्जाचा हप्ता नियंत्रणात राहिल.