आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात पॉइंट्स टेबलमधील 2 आघाडीच्या संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 17 व्या हंगामातील उपविजेता विरुद्ध पहिल्या मोसमातील विजेता यांच्यात ही लढत होणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील नववा सामना असणार आहे. पंजाब 8 सामन्यांनंतरही अजिंक्य आहेत. त्यामुळे राजस्थानसमोर पंजाबचा विजयी झंझावात रोखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे राजस्थान यात यशस्वी होणार ही पंजाब विजयी घोडदौड कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.