West Bengal Assembly Election 2026 : बंगालचं राजकारण तापलं, तुम्हाला मारुन टाकणार, आई-मुलगा थेट सिंघम IPS अजय पाल यांच्या दरबारात
admin April 29, 2026 06:25 PM
[ad_1]

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. हे मतदान सुरु असताना अनेक ठिकाणी राडे सुरु आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंसाचार, झडपांच्या बातम्या येत आहेत. फाल्टा विधानसभेत तृणमुल काँग्रेसवर धमकी देण्याचा आरोप आहे. तृणमुलचे लोक आम्हाला धमक्या देतायत असा मतदारांचा आरोप आहे. आई-मुलगा तक्रार घेऊन ऑब्जर्वर अजय पाल शर्मा यांच्याजवळ गेले आहेत. टीएमसीचे लोक मर्डर करण्याची धमकी देत आहेत. मतदान केल्यानंतर मर्डरची धमकी देण्यात आली आहे. फाल्टाच्या 204 मतदान केंद्राचा विषय आहे. मतदान केल्यानंतर दिलीप मंडल आणि त्यांच्या आईला हत्येची धमकी दिली जात आहे. आई-मुलीने अजय पाल शर्मा यांची भेट घेतली. त्यांनी सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान बंगालमध्ये अनेक ठिकाणी वाद झाला आहे. हिंसा आणि बॉम्बफेक रोखण्यासाठी CRPF ची तैनाती करण्यात आली आहे. मात्र, तरीही हिंसाचार, झडपा सुरु आहेत. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात भाजप उमेदवार विकास सरदार यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांची गाडी फोडण्यात आली. त्यांनी मला मारलं, ‘जय बांग्ला’ चे नारे देत शिवीगाळ केली असं विकास सरदार म्हणाले. इथे काही सुरक्षा नाहीय. एक उमेदवार म्हणून मला सुरक्षा मिळत नसेल तर सर्वसामान्यांना काय सुरक्षा मिळणार? असं विकास सरदार म्हणाले.

जहांगीर खान यांचा भाग

फाल्टाच्या बेलासिंघा येथे 186 नंबर बूथवर सुरक्षा पथकांनी लाठीचार्ज केला. पोलिंग बूथच्या 100 मीटरच्या परिसरात लोकांची गर्दी जमा झालेली. सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि गर्दी हटवण्यासाठी सेंट्रल फोर्सच्या जवानांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं आहे. फाल्टा टीएमसी नेते जहांगीर खान यांचा भाग आहे.

लाठीचार्ज करावा लागला

हावडाच्या बाली विधानसभा क्षेत्रात डॉन बॉस्को लिलुआ सहनलाल विद्यालयात मतदान केंद्रावर EVM मशीन खराब झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर मतदान प्रक्रिया बाधित झाली. त्यानंतर मतदार खवळले. परिस्थिती बिघडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात सुरक्षा पथकांना लाठीचार्ज करावा लागला. दोन जणांना अटक करण्यात आली आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.