मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये सलग 3 पराभवांचा सामना करावा लागलाय. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबईने आपल्या घरच्या मैदानात 29 एप्रिलला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. मुंबईने हैदराबादसमोर 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 243 धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईची ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादला 244 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता मुंबई या 243 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरते की हैदराबाद सामना जिंकते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.