'माझा मुलगाच जगात नाही, तर महालाचं काय करू...?'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 30, 2026 03:43 PM

Tamil Actor Daniel Balaji Mother Leaves 80 Crore Bungalow: आई आणि मूलाचं नातं काय असतं, हे शब्दांत सांगण्याची गरज नाही. नऊ महिने आपल्या गर्भात बाळाला सांभाळते आणि पुढे त्याच्या जन्मानंतर आयुष्यभर त्याची काळजी घेते. आई-मुलाचं नातं हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि जिव्हाळ्याचं नातं. या नात्यात प्रेम, माया, काळजी आणि त्याग यांचा अनमोल संगम असतो. मुलाच्या प्रत्येक यशात आईचा आनंद दडलेला असतो, तर त्याच्या प्रत्येक दुःखात ती तितकीच वेदना अनुभवते. यापूर्वी आपण आई मुलाच्या नात्याची अनेक उदाहरण पाहिलीत. सध्या एका सुपरस्टारची आई चर्चेत आहे. आपल्या सुपरस्टार (Superstar Actor) लेकाच्या निधनानंतर या माऊलीनं जे पाऊल उचललं, ते पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. 

साऊथ सिनेमांमधला (South Film) प्रसिद्ध चेहरा अभिनेते डेनियल बालाजी (Actor Daniel Balaji) यांचं निधन झालंय. 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या आईला आजही या दुःखातून सावरता आलेलं नाही. डेनियल यांनी विशेषतः मल्याळम आणि तमिळ सिनेमांमध्ये (Tamil Movie) नकारात्मक भूमिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अशा अकाली एग्झिटनं त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. आजही त्यांची आई आपल्या लाडक्या लेकाचं दुःख पचवू शकलेली नाही. स्टार अभिनेत्याच्या आईनं घेतलेल्या एका निर्णयानं तिच्या लेकाच्या जाण्यानं तिच्या काळजावर किती मोठा आघात झालाय, याची प्रचिती येते. 

न्यूज 18 नं दिलेल्या वृत्तानुसार, दिवंगत अभिनेते डेनियल बालाजी यांनी आपल्या आईसाठी तब्बल 80 कोटी खर्च करुन आलिशान महालासारखा बंगला बांधला होता. त्यांची आई याच घरात राहायची. पण, आपल्या लाडक्या मुलाच्या निधनानंतर त्या माऊलीनं या कोट्यवधींच्या घराचा त्याग केला. आपल्या मुलाशिवाय त्या आलिशान घरात राहणं आईला शक्य झालं नाही. त्या घरातला प्रत्येक कोपरा त्या आईला तिच्या मुलाचीच आठवण करुन देत होता. त्यामुळे तिनं तो आलिशान बंगला सोडून मुलानं बांधलेल्या मंदिराशेजारी जाऊन झोपडीत राहायला सुरुवात केली. 

दिवंगत अभिनेते डेनियल बालाजी कोण? 

दिवंगत अभिनेते डेनियल बालाजी यांचं 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. डॅनियल यांनी नकारात्मक भूमिकांच्या माध्यमातून मल्याळम सिनेसृष्टीत स्वतःचं एक महत्त्वाचं आणि वेगळं स्थान निर्माण केलं. 2024 मध्ये, अवघ्या 48 व्या वर्षी अभिनेत्याचं निधन झालं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या. खलनायकाच्या भूमिकेसाठी ते दिग्दर्शकांची पहिली पसंती बनले होते. त्यांच्या अभिनयामुळे प्रत्येक पात्र अधिक प्रभावी आणि जिवंत वाटत असे. त्यांनी साकारलेली अनेक पात्रं प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेलीत.

डेनियल बालाजी यांनी 2002 साली प्रदर्शित झालेल्या 'एप्रिल मथथिल' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'वेट्टॅयाडु विलॅयाडु', 'पोल्लाधवन' आणि 'वाडा चेन्नई' यांसारख्या सिनेमांनी त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. कमल हसन यांचा *मरुथनायगम* हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक भाग होता; जरी हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, तरी याच काळात डॅनियलच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दूरचित्रवाणी क्षेत्रात केली होती. त्याला अध्यात्मातही गाढ रुची होती. शिवाय, त्याने चेन्नईच्या आवडी येथे एक मंदिर उभारलेलं. 

Sidharth Bhardwaj Life Story: 'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.