Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?
esakal April 30, 2026 03:45 PM

Vedanta Demerger: भारतीय शेअर बाजारातील एक प्रमुख आणि मोठी कंपनी असलेल्या Vedanta Limited कंपनीचे शेअर्स आज गुरुवारी एकदम कोसळले. NSE सेन्सेक्स वर शेअर तब्बल 62.58% नी घसरून ₹289.50 वर आला, तर काल हा शेअर ₹773.60 वर बंद झाला होता. मात्र शेअर मध्ये झालेली ही मोठी घसरण पाहून घाबरण्याचं कारण नाही, कारण हा बदल कंपनीच्या विभाजन (Demerger) प्रक्रियेचा तांत्रिक परिणाम आहे.

कंपनी आपल्या विविध व्यवसायांचे विभाजन करून स्वतंत्र कंपन्या तयार करत आहे. या योजनेनुसार Vedanta चे अॅल्युमिनियम, ऑइल & गॅस, पॉवर आणि स्टील हे चार मोठे व्यवसाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागले जात आहेत. त्यामुळे मूळ शेअरमधून या व्यवसायांची किंमत वेगळी झाल्याने शेअरचा भाव कमी दिसत आहे.

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

या विभाजनानंतर Vedanta समूह एकूण 5 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागला जाणार आहे. यात-

  • Vedanta Aluminium

  • Vedanta Oil & Gas

  • VedantaPower

  • Vedanta Steel and Ferrous Materials

  • Vedanta Limited या कंपन्यांचा समावेश असेल.

कुणाला मिळणार लाभ

या विभाजनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांकडे 29 एप्रिलपर्यंत Vedanta चे शेअर्स होते, त्यांना प्रत्येक शेअरमागे नवीन तयार होणाऱ्या चार कंपन्यांचे प्रत्येकी एक शेअर मिळणार आहे. मात्र 30 एप्रिलनंतर शेअर्स खरेदी करणाऱ्यांना हा फायदा मिळणार नाही. 1 मे हा रेकॉर्ड डेट असून त्या दिवशी बाजार बंद असल्यामुळे एक्सचेंजने गुरुवारी विशेष सेशन घेऊन नवीन अॅडजस्टेड प्राइस ठरवला.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं? वेगवेगळे लिस्टिंग होणार

तज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या विभाजनामुळे प्रत्येक व्यवसाय स्वतंत्रपणे वाढू शकतो. त्यामुळे मध्यम आणि दीर्घकालीन कालावधीत गुंतवणूकदारांना फायदा होण्याची शक्यता असते. कंपनीने सांगितले आहे की, नव्या कंपन्यांचे शेअर्स जूनच्या मध्यापर्यंत मार्केटमध्ये लिस्ट होण्याची शक्यता आहे. तसेच ही संपूर्ण विभाजणाची प्रक्रिया 1 मे पासून प्रभावी होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.