Keshav Upadhye news : भाजपच्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच केशव उपाध्ये मनातलं बोलले; म्हणाले, ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो...
Sarkarnama April 30, 2026 03:45 PM

Maharashtra MLC election news : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुरूवातीला पक्षाचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या नावाची बरीच चर्चा होती. मात्र, अंतिम यादीत त्यांचे नाव आले नाही. मागील अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने त्यांच्या नावाची केवळ चर्चाच झाली. त्यावरून सोशल मीडियातही तर्कवितर्क लढविले होते. यावेळीही तेच घडले अन् केशव उपाध्ये मनातलं बोलून गेले.

केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या २५ ते ३० वर्षांपासूनच्या पक्षातील वाटचालीवर भाष्य करतानाच ट्रोलिंग करणाऱ्यांनाही टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता.

प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द,यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो. अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या, “संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही... वह भी सही...”, अशी भावना उपाध्ये यांनी व्यक्त केल्या आहेत.

Assembly Election exit poll : काँग्रेससाठी सर्वात मोठी बातमी; पाचपैकी दोन राज्यात मिळणार सत्ता, भाजपही इतिहास घडविणार

हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते. आणि तीच भूमिका आजही कायम आहे.परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांचे अभिनंदनही उपाध्ये यांनी केले आहे.

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागणार; एक्झिट पोल समोर, कुणी पलटवला डाव?

सोशल मीडियात ट्रोल करणाऱ्यांवर उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा.’उपाध्ये यांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचाही उल्लेख केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.