Bank Holiday 1 May 2026: आज, 30 एप्रिल हा या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मे महिना सुरू होईल. उद्या, 1 मे, महिन्याच्या पहिल्या दिवशीच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असल्यामुळे बँक ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 मे ला देशभरातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. त्यामुळे, जर तुम्ही उद्या बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर भेट देण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती करून घ्या.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकांच्या सुट्ट्यांची यादी आगाऊ प्रसिद्ध करते, ज्यामध्ये कोणत्या शहरांमध्ये, कोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणांसाठी बँका बंद राहतील याचा तपशील असतो. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी, आरबीआयच्या बँक सुट्ट्यांची यादी नक्की तपासा.
Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं? बँकांना सुट्टीशुक्रवार 1 मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्याने राज्यातील मुंबईसह सर्व शहर आणि गावांतील बँका बंद असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना उद्या बँकांच्या शाखांमध्ये जाऊन कोणताही फिजिकल व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे ज्यांना बँकेत जाऊन व्यवहार करायचा आहे त्यांनी आजच आपले काम करून घ्यावे.
महाराष्ट्रसह 1 मे रोजी देशभरात कामगार दिनानिमित्त अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, गंगटोक, जयपूर, कोहिमा आणि शिलाँग ही शहरे वगळता इतर सर्व शहरांमध्ये बँका बंद राहतील. त्यामुळे जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल, तरच तुम्ही उद्या बँकेत जाण्याचे नियोजन करू शकता.
या सेवा मात्र सुरूमहाराष्ट्र दिनाला राज्यातील सर्व बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग, UPI अॅप्स, तसेच NEFT आणि RTGS सेवा सामान्यप्रमाणे चालू राहतील. तसेच ATM सेवाही कार्यरत राहील.
दरम्यान, कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्ससारखी बँकेतील प्रत्यक्ष कामे या दिवशी होणार नाहीत. ही कामे करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल.
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगार किती वाढणार? 8व्या वेतन आयोगाच्या पहिल्या बैठकीत मोठा संकेत बँका कधी बंद असतात?भारतातील बँकांच्या सुट्ट्या ह्या RBIद्वारे निर्धारीत केल्या जातात. देशभरातील सर्व अनुसूचित आणि गैर-अनुसूचित बँका प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार, आणि सर्व रविवारी बंद असतात. या व्यतिरिक्त प्रत्येक राज्यानुसार सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या वेगवेगळ्या असतात