Flower Moon Beauty: जेऊरमध्ये 'फ्लॉवर मून'चे मोहक दर्शन; फुलांच्या पौर्णिमेचा अद्भुत नजारा कैद
esakal May 01, 2026 11:45 PM

जेऊर : आज पोर्णिमेच्या दिवशी Flower Moon (फ्लॉवर मून) याचे दर्शन झाले असून त्याचे आकर्षक असे रूप आज रसिक बांधवाना न्याहाळता आले. त्याचे सुंदर असे रूप आज बघता आले.Flower Moon हा मे महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दिलेला पारंपरिक नाव आहे.

हे नाव प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील आदिवासी लोकांनी दिले आहे.मे महिन्यात सर्वत्र फुले फुलण्याचा काळ असल्यामुळे याला “Flower Moon” असे म्हणतात. मराठीत याला “फुलांचा पौर्णिमा चंद्र किंवा “फुलांची पौर्णिमा " असे म्हणू शकतो.

फ्लॉवर मुनचे महत्त्व:

हा चंद्र वसंत ऋतूच्या शेवट आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. निसर्गातील नवचैतन्य, फुलांचा बहर आणि समृद्धी याचे प्रतीक आहे. त्याचे आज पौर्णिमेच्या दिवशी सुंदर असे छायाचित्र सकाळचे वाचक समीर मानियार यांनी काढले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.