मालाड SRA प्रकल्पात 275 कोटींचा घोटाळा उघड
गुंतवणूकदारांकडून निधी उभारून प्रकल्प ठप्प
ED आणि SEBI कडे तक्रार दाखल
रहिवाशांना घरे व भाडे भरपाई अद्याप नाही
मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप
संजय गडदे, मुंबई
मुंबईतील मालाड पूर्व येथील खोट डोंगरी SRA पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात शाह हाउसकॉन प्रायव्हेट लिमिटेड, सार्वजनिक सूचीबद्ध बी राइट ग्रुप आणि संबंधित व्यक्तींविरोधात ED आणि SEBI कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, या प्रकल्पाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उभारण्यात आले, मात्र प्रकल्पाची कामे पुढे सरकली नाहीत. सुमारे २७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक, निधीचा गैरवापर, मनी लॉन्ड्रिंग आणि गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्नडेव्हलपर कंपनीने आधीच गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर आणि जुने वाद सुरू असतानाही विविध लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पावर अनेक आर्थिक दावे निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र रहिवाशांना अनेक वर्षांपासून घरे मिळालेली नाहीत. तसेच काहींना भाडे भरपाईही देण्यात आलेली नाही.
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...फेब्रुवारी २०२६ मध्ये याच प्रकल्पासंदर्भात ५.१५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा मन्सुख शाह आणि आकाश शाह यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तक्रारदारांनी SEBI कडे संपूर्ण व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट, बँक खात्यांची चौकशी आणि निधीचा मागोवा घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील रिअल इस्टेट आणि SRA प्रकल्पांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.