Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांसह नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करावा आणि नराधमाला फाशी दिल्याचं जाहीर करावं, असी मागणी आंदोलकांनी केली आहे. नसरापूर प्रकरणी मुंबई-बंगळुरु रोड गेल्या 4 तासापासून बंद होता. मात्र, अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत नवले पूल मोकळा केला आहे. आंदोलकांना हटवण्यात पोलिसांनी यळ आलं आहे. मात्र, यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक कॉल करावा आणि आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे असं सांगावं असी प्रतिक्रिया आंदोलन करणाऱ्या महिलेनं दिली आहे. आम्हाला रिझल्ट पाहिजे, त्या नराधमाचा एन्काऊंटर का नाही झाला? याचं पण आम्हाला उत्तर पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी दिल्या आहेत. मुख्यमंतच्री गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडं का दुर्लक्ष केलं आहे? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.