छत्रपती संभाजीनगर: ‘आम्ही पोलिस आहोत. क्रांती चौकात खून झाला, तुमच्यावर संशय आहे’, असे सांगत दोन भामट्यांनी एका पादचाऱ्याला अडवले. नंतर अंगझडतीच्या आडून ६८ हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवले. उस्मानपुरा परिसरातील वन विभागाच्या भिंतीलगत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ओमप्रकाश भुतडा (वय ५०, रा. हैदराबाद) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, ते त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. परत हैदराबादला जाण्यासाठी २६ एप्रिलला दुपारी साडे बाराला ते रेल्वे स्थानकाकडे पायी निघाले.
Tukaram Munde Gokul milk Kolhapur : 'गोकुळ दूध संघावर प्रशासक म्हणून तुकाराम मुंडे नियुक्त करा', शिवाजी पाटलांच्या गुगलीने चर्चांना उधाणतेव्हा वन विभागाच्या भिंतीलगतच दोन भामट्यांनी त्यांना गाठले. खूनप्रकरणी तुमची अंगझडती घ्यायची आहे असे म्हणताच भुतडा घाबरले. हे लक्षात येताच भामट्यांनी त्याचा फायदा घेतला.
गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या. हे भुतडा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार निखील खराडकर हे करत आहेत.