'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
जयदीप मेढे May 03, 2026 01:13 PM

Abhishek Banerjee on BJP: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकीय संघर्षाची सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व 285 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्व सहायक मतदान केंद्रांवरही नव्याने मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की, 21 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत फेरमतदान घेण्यात यावे आणि 24 मे रोजी मतमोजणी होईल. पश्चिम बंगालच्या 293 मतदारसंघांचे निवडणूक निकाल 4 मे रोजी जाहीर केले जातील, मात्र या घोषणेमधून फाल्टा मतदारसंघाला वगळण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने हा निर्णय का घेतला?

29 एप्रिल रोजी मतदानादरम्यान झालेल्या संघर्षाच्या आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (EVM) स्टिकर्स लावण्याच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये तीव्र राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधत, डायमंड हार्बर मॉडेल कोसळले असल्याचे म्हटले. यानंतर  अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

संतप्त अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी अमित मालवीय यांच्या वक्तव्यावरून भाजपला थेट आव्हान देत म्हटले की, त्यांच्या डायमंड हार्बर मॉडेलला कोणीही हानी पोहोचवू शकणार नाही, विशेषतः बंगाली-विरोधी गुजराती टोळीसुद्धा. हे साध्य करण्यासाठी दहा जन्मही अपुरे पडतील, असेही ते पुढे म्हणाले. अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "माझ्या 'डायमंड हार्बर मॉडेल'ला धक्का लावण्याची ताकद तुमच्या 'बांगला विरोधी' गुजराती गँग आणि त्यांच्या ज्ञानेश कुमारसारख्या प्याद्यांमध्ये नाही; यासाठी त्यांना दहा जन्मही पुरणार नाहीत. तुमच्याकडे जितकी ताकद आहे, ती सर्व पणाला लावा. मी संपूर्ण केंद्र सरकारला आव्हान देतो, हिंमत असेल तर 'फाल्टा'मध्ये येऊन माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा. दिल्लीत बसलेल्या तुमच्या कोणत्याही बड्या नेत्याला मैदानात उतरावा, मी तयार आहे."

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.