आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 48 व्या सामन्याच दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन अक्षर पटेल याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात अनुभवी आणि प्रमुख फलंदाज महेंद्रसिंह धोनी याचं कमबॅक झालंय की नाही? हे आपण जाणून घेऊयात.
चेन्नई आणि दिल्ली दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. चेन्नईकडून 2 बदल करण्यात आले आहेत. फिरकीपटू अकील हौसेन आणि गुरजनप्रीत सिंह या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर महेंद्रसिंह धोनी याच्या कमबॅकची क्रिकेट चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कायल जेमीसन याच्या जागी लुंगी एन्गिडी याचं कमबॅक झालं आहे. लुंगी एन्गिडी याला फिल्डिंग करताना डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे लुंगीला काही सामन्यांना मुकावं लागलं होतं.
नवी दिल्लीतील या स्टेडियममध्ये 2026 वर्षात आतापर्यंत एकूण 4 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी एका सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 3 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. त्यामुळे आता अक्षर पटेलचा पहिले बॅटिंगचा निर्णय किती योग्य ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात 11 एप्रिलला आमनासामना झाला होता. तेव्हा चेन्नईने दिल्लीचा 23 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे दिल्ली या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पाथुम निसांका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि टी नटराजन.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि गुर्जपनीत सिंग.