'तुम्बाड 2' मध्ये आलिया भट्टची एन्ट्री? 20 दिवसांचं शूट, नेमकी भूमिका काय ? चित्रपटाबाबत जबरदस्त ट्विस्ट
abp majha web team May 05, 2026 10:13 PM

Alia Bhatt in Tumbbad 2: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आता लवकरच हॉरर जॉनरमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका यशस्वी हॉरर फ्रँचायझीच्या पुढील भागात ती दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिने शूटिंगलाही सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. (Tumbbad 2)

2026 आणि 2027 या वर्षांसाठी आलियाकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. यामध्ये यशराज फिल्म्सची स्पाय थ्रिलर ‘अल्फा’ आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटांचा समावेश आहे. याचदरम्यान आता तिच्या हाती आणखी एक मोठी आणि यशस्वी फ्रँचायझी लागल्याची चर्चा आहे. या चित्रपटात तिची भूमिका खूप मोठी नसली, तरी ती अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे.

‘तुम्बाड 2 मध्ये आलियाची एन्ट्री? 

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ॲक्शन, रोमँस आणि गंभीर भूमिका साकारल्यानंतर आलिया भट्ट आता ‘तुम्बाड 2’ या हॉरर फँटसी ड्रामामधून या जॉनरमध्ये प्रवेश करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दिकीनंतर आता या यशस्वी फ्रँचायझीमध्ये आलियाचं नावही जोडण्यात आलं आहे आणि तिने शूटिंगलाही सुरुवात केली आहे. ती जवळपास 20 दिवस या चित्रपटासाठी शूटिंग करणार असल्याचं समोर आलं आहे. तिचा स्क्रीन टाइम मर्यादित असला, तरी तिची भूमिका अत्यंत प्रभावी असेल आणि कथेत अनेक ट्विस्ट-टर्न्स आणेल. तसेच हा रोल पुढील ‘तुम्बाड 3’साठीही पाया घालणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कथेने जिंकलं आलियाची मन

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गंगूबाई’ फेम अभिनेत्रीला ‘तुम्बाड 2’ची स्क्रिप्ट खूपच आवडली असून तिने लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला. या वेळी चित्रपटाची कथा अधिक भव्य आणि दमदार असणार असून बजेटही वाढवण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जवळपास 100 कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार केला जात आहे. या चित्रपटात सोहम शाह, नवाजुद्दीन सिद्दिकी, निमिषा सजयान आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. मात्र, आलियाच्या नावावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मेकर्सनी जाहीर केल्याप्रमाणे ‘तुम्बाड 2’ डिसेंबर 2027 मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.