संडे हो या मंडे रोज खाओ अंडे …असं म्हटल जातं. कारण की अंड्यात प्रोटीन व इतर व्हिटामीन्स असतात. जे शरीर सृदृढ ठेवण्यात मदत करतात. यामुळे आपण अंडी सरासपणे खातो. पण तुम्हाला माहीत आहे का की सगळीच अंडी काही तुमच्यासाठी आरोग्यदायी नसतात. तर त्यातील काही ठराविक अंडीच आपल्याला शक्तीशाली बनवतात. हा फरक अंड्यातील बलकाच्या रंगावरून ओळखला जातो. कारण अंड्यातील बलकाच्या रंगावरून ती ज्या कोंबडीची अंडी आहेत तिचे आरोग्य कळते.
साधारणत एका अंड्यातून आपल्याला ६ ग्रॅम प्रोटीन्स मिळते. ज्यातील अर्धे प्रोटीन्स अंड्याच्या पांढऱ्या भागात असते. तर अर्धे पिवळ्या बलकातून मिळते. मात्र तज्ज्ञांच्यामते अंड्यातील पिवळ्या बलकाच्या रंगातून अंड्यात किती प्रोटीन्स आहे ते कळते. साधारणत अंड्याच्या बलकाचा रंग पिवळा,आणि नारंगी असतो. हे रंग त्या कोंबडीच्या आहारानुसार असतात.
ज्या कोंबड्या मोकळ्या रानावर किडा मुंग्या, हिरेव गवत, मक्याचे दाणे खातात त्यांच्या अंड्याच्या बलकाचा रंग नारंगी असतो. हा नारंगी रंग कोंबडी खात असलेल्या नैसर्गिक खाद्यप्रकारामुळे आलेला असतो.यामुळे नारंगी बलक असलेल्या अंड्यात प्रोटीन्स आणि व्हिटामीन्स मुबलक असतात. या अंड्यात विटामिन-A, व्हिटामिन-E आणि ओमेगा-3 फैटी एसिडचे प्रमाण अधिक असते. तसेच यात विटामिन-A, विटामिन-E आणि ओमेगा-3 फैटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. तज्त्रांच्यामते असे अंडे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर असते.
तर ज्या कोंबड्या पिंजऱ्यात, खुराड्यात असतात. त्यांना खाण्यासाठी फक्त धान्य दिले जाते. अशा कोंबडीच्या अंड्याचे बलक हलक्या पिवळ्या रंगाचे असते. यात नैसर्गिक प्रोटीन्सचे प्रमाण साधारण असते.





