Latest Marathi News Live Update : रद्द झालेल्या शपथविधी समारंभाच्या ठिकाणाहून शेकडो टीव्हीके समर्थक निराश होऊन परतले
esakal May 07, 2026 02:45 PM
Tamilnadu Live : रद्द झालेल्या शपथविधी समारंभाच्या ठिकाणाहून शेकडो टीव्हीके समर्थक निराश होऊन परतले

विजय यांना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याच्या आशेने प्रेरित होऊन, शेकडो टीव्हीके समर्थक गुरुवारी नेहरू इनडोअर स्टेडियमवर जमले होते; मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना केवळ बंद दरवाजे आणि नियोजित कार्यक्रमांबाबत माहितीचा पूर्ण अभावच दिसला.

Navi Mumbai Live : नवी मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि अखंडित विमानसेवा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मान्सूनपूर्व देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्याने. विमानतळावरील उड्डाण सेवा तब्बल सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार

युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असतानाच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव येथे दोन वेगवेगळ्या युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्त

गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्त

गांधीनगर मार्गावरील बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या नोटीसचा कालावधी आज (ता. ७) संपणार आहे. त्यामुळे महापालिकेने शुक्रवारपासून (ता. ८) ही बांधकामे पाडण्याची तयारी केली आहे. दरम्यान, या संदर्भातील सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकांच्या सुनावणीवर ही कारवाई अवलंबून असण्याची शक्यता आहे.

सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू

सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू

सुधारित निवृत्तिवेतनासाठी १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले. मार्च २०२४ पासून योजना लागू होऊनही रखडलेली कार्यपद्धती अखेर सरकारकडून लागू करण्यात आली. २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्तिवेतन व महागाई भत्तावाढ लागू करण्यात आला आहे. अर्थात त्यासाठी सुधारित योजना कर्मचाऱ्यांना स्वीकारावी लागेल.

पुण्यात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकीसह चोर पसार

पुण्यात टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकीसह चोर पसार

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची ऑनलाइन जाहिरात देणे एका वाहनमालकाला चांगलेच महागात पडले.टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी चोरून नेणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महम्मद मुजबता इकबाल शेख (वय २७, रा. खडी मशिन चौक, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केली होती.त्यावर एका व्यक्तीने ईशिता माथुर नावाच्या प्रोफाईलमधून गाडी घेण्यास रस दाखवला.त्यानंतर ‘टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने नजर चुकवून तो दुचाकीसह पसार झाला.

अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडून अत्याचार

Latest Marathi Live Updates 07 may 2026 : अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडितेशी तिच्या वडील आणि मामाने अश्लील वर्तन केले, अशी फिर्याद पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा वडील आणि मामाला अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी या दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.