आता याला काय म्हणावे? उद्घाटनापूर्वीच पुलाचा पिलर कोसळला; पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह
Marathi May 07, 2026 04:25 PM

गडचिरोली: कोरची तालुक्यातील नाडेकल-बेटकाठी-धोलीगोटा मार्गावरील खोब्रागडी नदीवर पूलअतिशय धक्कादायक आणि गंभीर परिस्थिती समोर आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत बांधण्यात आलेला हा पूल कोसळल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पुलाचा एक पिलर आणि दोन स्लॅब एकदा नव्हे तर दोनदा कोसळले आहेत. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.

संबंधित ठेकेदाराच्या कामावर लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, पुलाचा तुटलेला भाग लपवण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे अवशेष वाळूखाली दाबले गेले. या प्रकारामुळे भ्रष्टाचार तर होतोच, पण नागरिकांच्या जीवाशी खेळल्याचा आरोपही होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र, चौकशी अहवालानंतरही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी स्वत: पाहणी करून नाराजी व्यक्त केली.

पश्चिम बंगाल निवडणूक : आसनसोलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या; राहुल गांधींची आक्रमक भूमिका, म्हणाले, “बंगालमध्ये गुंडराज…

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आमदारांनी व्यक्त केली.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ढिसाळ व निष्काळजी कारभारामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बंगाल हिंसाचार: भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या; चारपैकी तीन गोळ्या थेट डोक्याला लागल्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.