SSC Exam Result : पुण्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची विभागीय मंडळात आघाडी; दहावीच्या परीक्षेत ९६.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
esakal May 09, 2026 03:45 AM

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ६४ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ४९ हजार ७५३ विद्यार्थी (९४.२४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय मंडळातून पुणे जिल्ह्यातून दहावीची परीक्षा दिलेल्या एक लाख ३२ हजार ७०७ विद्यार्थ्यांपैकी एक लाख २८ हजार २२ म्हणजेच ९६.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय मंडळात दहावीच्या निकालात उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी मिळवली आहे.

पुणे विभागीय मंडळामार्फत दहावीच्या परीक्षेसाठी दोन लाख ६६ हजार ६५६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील दोन लाख ६४ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी चार हजार ६३१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील चार हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी एक हजार ३८४ विद्यार्थी (३०.७४) उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे आणि सचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांनी दिली.

विभागीय मंडळातील निकालाची वैशिष्ट्ये

१,१४० - १०० टक्के निकालाच्या शाळा

०६ - शून्य टक्के निकालाच्या शाळा

५८,६०४ - सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी

५,५९१ - एटीकेटी लागू असलेले विद्यार्थी

१५,६३६ - पुरवणी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी

परीक्षेतील गैरप्रकार

पुणे - ८

अहिल्यानगर - १७

सोलापूर - १७

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.