IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण
esakal May 09, 2026 03:45 AM

IPL 2026 playoff qualification scenario explained: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. आयपीएल गुणतालिकेत त्यांनी ९ गुणांसह सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि आता चार जागांसाठी अजूनही ७ संघ शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स हे बाद वाटत असले तरी त्यांच्यासाठी अजूनही अंधुक संधी आहे. त्यासाठी त्यांना इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

DC vs KKR सामन्यात काय घडले?

पथूम निसंकाच्या अर्धशतकाच्या आणि आशुतोष शर्मा ( ३८) व लोकेश राहुल ( २३) यांच्या योगदानाच्या जोरावर दिल्लीने ८ बाद १४२ धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी आज निराशाजनक कामगिरी केली. प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सने १४.२ षटकांत केवळ दोन फलंदाज गमावून दणदणीत विजय मिळवला. फिन अॅलनने षटकाराने संघाचा विजय व स्वतःचे शतक पूर्ण केले. तो ४७ चेंडूंत ५ चौकार व १० षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला. त्याच्यासोबतीला कॅमेरून ग्रीनने ( ३३) तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची नाबाद भागीदारी केली.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक IPL 2026 Point Table

इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या गुणतालिकेत सध्या सनरायझर्स हैदराबाद १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. पंजाब किंग्स १३ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १२ गुणांसह अव्वल चारमध्ये आहेत. गुजरात टायटन्सनेही १० सामन्यांत १२ गुणांची कमाई केली आहे आणि ते अजूनही शर्यतीत आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात १० सामन्यांत १० गुण असले तरी ते १८ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत राहू शकतात. कोलकाताने विजय मिळवून १० सामन्यांत ९ गुणांसह आव्हान राखले आहे. ते उर्वरित चार सामने जिंकून १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतात...

IPL 2026 PlayOff Scenario

SRH ३ सामन्यांत विजय मिळवून २० गुणांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांना उर्वरित सामन्यांत गुजरात, चेन्नई व बंगळुरूचा सामना करायचा आहे. हे तिन्ही संघ अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे हैदराबादने तिन्ही सामने गमावल्यास, ते स्पर्धेबाहेर फेकले जातील. तीनपैकी दोन सामने जिंकून ते १८ गुणांसह स्पर्धेत राहू शकतील, परंतु त्यांच्याविरुद्ध हरणाऱ्या संघांची पंचायत होईल.

IPL 2026 : हार्दिक पांड्या रायपूरला पोहोचला, पण Mumbai Indians च्या सराव सत्रात भाग नाही घेतला! सूर्यकुमारबाबत महत्त्वाचे अपडेट्स...

PBKS ने १० सामन्यांत १३ गुण गमावले आहेत आणि ते आणखी ८ गुण कमवून २१ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी किमान दोन ते तीन विजय गरजेचे आहेत. त्यांच्यासमोर दिल्ली, मुंबई, बंगळुरू व लखनौ यांचे आव्हान आहे. यापैकी बंगळुरू सोडल्यास अन्य तीन संघ जवळपास स्पर्धेबाहेर आहेत. त्यामुळे पंजाब त्यांना सहज नमवतील अशी अपेक्षा केली जात आहे. त्यांनी किमान दोन विजय मिळवल्यास ते १७ गुणांसह स्पर्धेत राहतील, परंतु इतरांचे निकाल त्यांना हवे तसे लागणे गरजेचे आहे.

RCB, GT व RR हे १० सामन्यांत प्रत्येकी १२ गुणांसह अव्वल चारमध्ये आहेत आणि त्यांना ३ विजय प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी पुरेसे आहेत. RCB ला उर्वरित सामन्यांत मुंबई, कोलकाता, पंजाब व हैदराबादचा सामना करायचा आहे, तर RR ला गुजरात, दिल्ली, लखनौ व मुंबईला टक्कर द्यायची आहे. गुजरातही १२ गुणांसह शर्यतीत आहे आणि त्यांच्यासमोर राजस्थान, हैदराबाद, कोलकाता व चेन्नई यांचे आव्हान आहे. या परिस्थिती RCB, RR, GT यांचे समान गुण होऊ शकतात आणि अशा वेळी नेट रन रेट निर्णायक भूमिका बजावेल.

चेन्नई, कोलकाताला कमी संधी

CSK ने १० सामन्यांत ५ विजय मिळवले आहेत आणि त्यांना उर्वरित चार सामन्यांतील विजय १८ गुणांपर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यांच्यासमोर लखनौ ( २ सामने), हैदराबाद व गुजरात यांचे आव्हान आहे आणि हैदराबादचा सामना वगळल्यास ते तीन सामने जिंकतील असे दिसतंय.. पण, तरीही ते १६ गुणांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. KKR उर्वरित तीन सामने जिंकून १५ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, परंतु एकही पराभव त्यांना स्पर्धेबाहेर फेकण्यास पुरेसा आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.