हैदराबाद: माजी आयपीएस अधिकारी विनय रंजन राय यांच्या पत्नी सुनंदा (55 वर्षे) यांची हत्या करण्यात आली आहे. हैदराबादच्या ज्युबली हिल्स भागात शुक्रवारी घरातच सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला आहे. राय यांच्या परिवाराने अलिकडेच नेपाळमधून आलेल्या महिलेला घरातील कामासाठी ठेवले होते. याच महिलेने स्वत:च्या साथीदारासोबत मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृतदेह प्रशासन नगर भागातील परिवाराच्या तीनमजली घरातील पहिल्या मजल्यावर मिळाला आहे. तर नेपाळी महिला घरातील मूल्यवान सामग्री चोरून फरार झाल्याचा आरोप आहे. तर हत्येच्या घटनवेळी विनय रंजन राय हे शहराबाहेर होते. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार समवेत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी करत तपासाला वेग दिला आहे.