परभणी: मनपा प्रशासनातर्फे आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनात शुक्रवारी (ता.आठ) मान्सुनपूर्व कामांच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली. शनिवारी (ता.नऊ) पहाटेपासून शहरातील विविध भागात मनपा कर्मचाऱ्यांनी सफाईच्या कामास प्रारंभ केला.
मनपाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील दहा ते बारा मोठे नाले तसेच छोट्या-मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी हि मोहीम राबवली जाते. या पार्श्वभूमीवर आयुक्त नार्वेकर यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीस उपायुक्त प्रजावंत कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत ,मालमत्ता विभाग प्रमुख भगवान यादव, उप अभियंता सुधीर टेहरा, सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, अब्दुल जावेद, मुख्य स्वच्छता व्यवस्थापक करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकात कुऱ्हा, विद्युत अभियंता सोहेल सिद्दीकी, अग्नीशामक विभागाचे जाधव, माहीती जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकळे, सहाय्आयुक्त गजानन जाधव, घनचकरा व्यवस्थापक प्रमुख मिर्झा तनवीर बेग, आदी उपस्थित होते.
CJI SuryaKant : " तर दोष ब्राह्मणांचा नसून..."; CJI सूर्यकांत यांच्या नावाने पसरवलेल्या खोट्या पोस्टमुळे खळबळ, सरन्यायाधीश संतप्त!यावेळी शहरातील मान्सुनपूर्व स्वच्छता कामांचा आढाव घेण्यात आला. हंगामी मान्सुनपुर्व तयारीच्या अनुषंगाने मान्सुन काळात नैसर्गीक आपत्ती पुर्वी , संरक्षण करून आपत्तीत होणारी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच मदत कार्यात यंत्रणा सज्ज ठेवण्या संदर्भात सुचना देण्यात आली. सावधगिरीच्या उपाययोजना संबधी सुचना व कामे समन्वयाने करण्यासाठी आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्याना सुचना दिल्या. शहरातील छोटे- मोठे नाल्यांची स्वच्छता करून घेण्यात यावेत.
दरवर्षी या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले जाते अशा ठिकाणी तात्काळ जेसीबी च्या साह्याने स्वच्छता करून घ्यावी अशा सूचना दिल्या. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तनवीर मिर्झा बेग यांनी शहरातील प्रभाग समिती अ.ब.क अंतर्गत तीन झोन मान्सुन पुर्व पथत तैनात करण्यात आल्याची माहीती दिली. याचबरोबर ज्या भागात घरात पाणी शिरते त्या परिसरातील शाळा व अन्य इमारती ताब्यात घेण्याच्य सुचना देण्यात आल्या. शहरातील संतगाडगेबाबा नगर, भीमनगर, परसावत नगर,जमजम कॉलनी, या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
राजस्थानला नमवून शुभमन गिल, राशीद खानचं स्पेशल सेलिब्रेशन; पोस्ट करून टीकाकारांना डिवचलेअक्षदा मंगल कार्यलय परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी जाते, त्या ठिकाणी तात्काळ स्वच्छता करण्याच्या सुचना देण्यात आल्याने शनिवारी पहाटेपासून या ठिकाणी स्वच्छता कामांना प्रारंभ करण्यात आला. याचबरोबर शहरातील प्रभाग समित्यांच्या विविध ठिकाणी स्वच्छतेच्या कामास प्रारंभ झाला. आरोग्य विभागानी स्वच्छता कामगारासाठी आरोग्य किट उपलब्ध करून देण्यात यावी. मलेरिया विभागामार्फत फवारणी करण्यात यावी. अग्नीशमन विगात तैनात करण्यात यावे. पथदिव्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेशशहरातील धोकादायक इमारतीची पाहणी करून त्या इमारतींना नोटीस द्यावी, शहरातील विना परवानगी होर्ल्डींग काढून घेण्यासाठी एजन्सीला नोटीस देण्याचे आदेश मालमत्ता व्यवस्थारपक भगवान यादव, संगणक विभाग अदनान कादरी यांना दिले. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व होर्डींग काढण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन नार्वेकरांनी दिले.
पूर्वपरवानगीशिवाय सुट्टी नाहीशहरातील पोस्ट कालनी, स्टेडियम कॉम्पलेक्स, जलतरणीका कॉम्पलेक्स या ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगी शिवाय सुट्टीवर जावू नये, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात यावी अशा सूचना आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या.