अभिनेते विजय हे तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री बनले आहे. चेन्नई येथील खचाखच भरलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल अर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. विजय यांच्या दोन वर्षे जुन्या टीव्हीके (TVK) पक्षाने आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या.
ALSO READ: मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांसाठी भाजपची मराठी शाळा, विशेष दोन पानी माहितीपुस्तिकेचे वाटप
तामिळगा वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख आणि अभिनेते-राजकारणी सी. जोसेफ विजय हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यांनी तामिळ भाषेत शपथ घेतली. यावेळी राहुल गांधीही उपस्थित होते. शपथ घेताना, विजय निर्धारित ओळींच्या पलीकडे बोलू लागले, त्यामुळे राज्यपाल अर्लेकर यांना त्यांना थांबवून फक्त लिहिलेलेच वाचण्यास सांगावे लागले.
विजय यांच्याकडे आता १२१ आमदार आहे, तर बहुमताचा आकडा ११८ आहे. १९६७ नंतर तामिळनाडूला प्रथमच गैर-द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री मिळणार आहेत. यापूर्वी, १९६३ ते १९६७ या काळात काँग्रेस सरकारमध्ये एम. भक्तवत्सलम मुख्यमंत्री होते.
ALSO READ: बंगालमध्ये 'कमळ' राज: ५ मंत्र्यांसह शुभेंदु अधिकारींनी घेतली शपथ, मोदींच्या रोड शोने दणाणली कोलकाता!
Edited by-Dhanashri Naik