Did CSK bowler attend Vijay swearing in Ashwin takes funny dig online तामिळनाडुत एकीकडे मुख्यमंत्री विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडला तर दुसरीकडे चेपॉक स्टेडियमवर सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमधला सामना झाला. या सामन्याआधी सोशल मीडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने केलेल्या ट्विटची चर्चा होत आहे. विजय यांच्या शपथविधीतला एक फोटो अश्विनने ट्विट केलाय. यात विजय यांच्या शेजारी उभा असलेला सुरक्षा अधिकारी चेन्नईचा गोलंदाज अशुंल कंबोजसारखा दिसत होता. त्यावरून आर अश्विनने फिरकी घेतली. या ट्विटनंतर सीएसकेच्या सोशल मीडियवरून अंशुलचा फोटो पोस्ट करण्यात आलाय.
विजय यांच्या शपथविधीतला फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी अंशुल कंबोज पोलीस ड्युटीवर पोहोचला असल्याचं म्हणत उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मीम्सही शेअर केले गेले. यातच भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने मिश्किल प्रतिक्रिया दिली.
अश्विनने व्हायरल फोटो पोस्ट करत म्हटलं की, कर्तव्य नेहमीच पहिलं असतं, पण सामन्याच्या दिवशी हे जास्तच झालं. कॅब बूक कर आणि लगेच चेपॉकवर जा अंशुल कंबोज, मोठा सामना आहे. अश्विनची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, अंशुल कंबोजचे फोटो आणि मीम व्हायरल होताच सीएसकेनेसुद्धा सोशल मीडियावरच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेत. सीएसकेने पोस्ट करत म्हटलं की, काळजी करू नका, अंशुल कंबोज इथंच आहे. चेन्नई सुपर किंग्जने पोस्ट केलेल्या व्हिडीओत अंशुल कंबोज गोलंदाजी करताना दिसतो