अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकणात दमट व उष्ण हवामान असणार.
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ही जाहीर करण्यात आला आहे. पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा आणि कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम प्रतीचा पाऊसपडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Maharashtra Weather : राज्यावर पावसाचे सावट कायम, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; कुठे पडणार पाऊस? जाणून घ्याया स्थितीमुळे विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागात ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. अरबी समुद्राकडून येणारे आर्द्र वारे आणि केरळ किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टविदर्भासह दक्षिण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. कोकण-गोव्यातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात तापमानात घट झाली असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसांचा अलर्ट देण्यात आलाय. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे.