RCB vs MI Rajat Patidar post match reaction: इंडियन प्रीमिअर लीग २०२६मध्ये २६४ धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग होत असतानारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची १६७ धावांचा पाठलाग करतान दमछाक झाली. भुवनेश्वर कुमारने २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला नसता तर मुंबई इंडियन्सचा विजय पक्का होता. त्यानंतर रसिख सलामने शेवटच्या चेंडूवर दोन धाव घेत RCB चा रोमहर्षक विजय पक्का केला. या विजयासोबत गतविजेत्यांनी IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. पण, असे असले तरी कर्णधार रजत पाटीदार या विजयावर फार आनंदी दिसला नाही.
प्रथम फलंदाजीला आलेल्या MIकडून तिलक वर्मा ( ५७) व नमन धीर ( ४७) यांनी चांगला खेळ केला. भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेऊन RCB ची अवस्था ३ बाद २८ अशी केली होती. पण, तिलक व नमन यांच्या ८२ धावांच्या भागीदारीने मुंबईची गाडी रुळावर आणली. भुवीने तिलकची विकेट घेऊन चार बळी पूर्ण केले. RCB कडून कृणाल पांड्याने ४६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७३ धावा केल्या. जेकब बेथेलने २७ धावांचे योगदान दिले. कॉर्बिन बॉशने चार विकेट्स घेतल्या.
Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?शेवटच्या षटकात विजयासाठी १५ धावा हव्या असताना राज बावाने एका चेंडूवर ५ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे ५ चेंडू १० धावा असा सामना RCB कडे झुकला. पण, त्याने रोमारिओ शेफर्डची ( ४) विकेट मिळवून ३ चेंडू ९ धावा असा सामना लांबवला. भुवीने खणखणीत षटकार मारून २ चेंडू ३ धावा अशी मॅच अटीतटीची केली. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना रसिख सलामने डाईव्ह मारून दुसरी धाव पूर्ण केली आणि RCB थरारक विजय निश्चित झाला. १४ गुणांसह बंगळुरू तालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
रजत पाटीदार म्हणाला," आता हे असे सामने नित्याचेच झाले आहेत. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. कृणाल पांड्याने संघासाठी मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली. त्याला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय संघाचाच होता; आम्ही संघाच्या बैठकांमध्ये यावर चर्चा केली होती. आम्हाला त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी द्यायची होती आणि त्याने ती जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे; अशा प्रकारचे खेळाडूच दबावाखाली असताना आणि अशा नाजूक परिस्थितीत संघासाठी निर्णायक कामगिरी करतात."
पाटीदारने ४ विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचे कौतुक केले. तो म्हणाला,"चेंडूवर त्याचे असलेले नियंत्रण खरोखरच अविश्वसनीय आहे. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर 'भुवी'चा सामना करणे अत्यंत कठीण असते. सध्या आम्ही गुणतालिकेची फारशी चिंता करत नाही आहोत; गुणतालिकेकडे पाहण्यापेक्षा, आम्हाला केवळ चांगला क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरण्याचे काम आमच्या गोलंदाजांनी अत्यंत जबरदस्तपणे केले. ते लक्ष्य सहजपणे गाठण्यासारखे होते; पण खरे सांगायचे तर, या सामन्यात विजय मिळवण्यास आम्ही पात्र नव्हतो. आम्ही ते लक्ष्य सहजपणे गाठायला हवे होते. आमच्याकडे तशी सक्षम फलंदाजी फळी उपलब्ध आहे."