Latest Marathi News Live Update : निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
esakal May 11, 2026 07:45 PM
Nashik Live: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

निदा खानला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार दिवसांची प्रारंभीची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज निदाला पुन्हा न्यायालयात सादर केले जात आहे. आजही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Live: हुंड्यासाठी अवघ्या 18 वर्ष्याच्या विवाहितेचा छळ, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी १८ वर्षीय विवाहितेचा छळ; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

अल्पवयात लग्न झाल्यानंतर सासरच्या छळाला कंटाळून तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप.

मुलगी अल्पवयीन असतानाही बदनामीच्या भीतीपोटी आई-वडिलांनी तिचे लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे.

Beed Live: बीड नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

बीड नगरपालिकेत धक्कादायक प्रकार समोर आलाय... थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून दोन जणांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

हिबानाम्यावरून सुरू असलेल्या मालमत्ता वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय.

Jalgaon Live : जळगावात ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद

जळगाव काही दिवस तापमानाचा पारा खाली गेल्यानंतर मागील तीन दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली. या दिलाशानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला आहे. आज जळगावात ४४.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दुसऱ्यांदा पारा ४४ अंशावर गेला आहे. यामुळे उष्णतेची तीव्रता वाढली असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.

Live: मंजुरीशिवाय जमिनीचे तुकडे विक्रीवर बंदी; महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय

राज्यात जमिनींच्या अनधिकृत तुकड्यांच्या विक्रीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. निवासी क्षेत्रात ऑक्टोबर २०२४ पूर्वी झालेले जमिनीचे तुकडे सरकारकडून मान्य करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Nashik News शेतकरी ऍसिड हल्ल्यात पोलीस मित्रच निघाला मुख्य आरोपी

शेतकरी ऍसिड हल्ल्यात पोलीस मित्रच निघाला मुख्य आरोपी

संशय टाळण्यासाठी आरोपीने दुसऱ्याच्या नावाने लिहिली होती चिठ्ठी

तपासादरम्यान पोलिसांसोबत राहूनच करत होता दिशाभूल

शेतकरी भाऊसाहेब बोर्डे दाम्पत्यावर झोपेत असताना केला होता ऍसिड हल्ला

नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे घटनेने उडाली होती खळबळ

शेतीच्या जुन्या वादातून चांगदेव मोरेने कट रचल्याचे उघडकीस

Nandurbar नवापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग, हवेत पसरले धुराचे लोट

नंदुरबारमध्ये नवापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले आहेत. आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात २८ महिन्यांत ५० चिमुरड्यांचे लैंगिक शोषण

जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत ४६ मुली आणि चार अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे या पीडित बालकांचे लचके तोडणारे दूरचे कुणी नाही तर बहुतांश परिचित असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

Kolhapur: राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, मनसेच्या वतीने कोल्हापुरात मोर्चा

राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच शेतकऱ्या ंच्या कर्जमाफी संदर्भात लावलेल्या नियमा अटी त्वरित शेती कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना देण्यात येणारे भत्ते पेन्शन रद्द करून शासनावरील आर्थिक भार कमी करावा यासह अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

CM Devendra Fadnavis: सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२६ ला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२६ साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली.

Gold Rate Live: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर पहिल्याच दिवशी सोन्याच्या दारात ८०० रुपयांनी आणि चांदीच्या दरात १००० रुपयांनी घसरण झाली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या ‘पंचवटी’ वास्तूवरून वाद; नातेवाईकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा नातवाचा आरोप

ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या पुण्यातील ऐतिहासिक ‘पंचवटी’ वास्तू पाडण्याच्या प्रयत्नांवरून वाद निर्माण झाला आहे. गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी गंभीर आरोप करत, या वास्तूला बिल्डरला विकण्यासाठी कुटुंबातील काही जवळचे नातेवाईक दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे.

‘गीतरामायण’सारख्या अजरामर साहित्यकृतीची साक्ष असलेली ही पवित्र वास्तू जपण्यासाठी आपण विरोध करत असल्यामुळे आपल्याला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असून जीवाला धोका असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Wardha- Arvi Live : वर्धा-आर्वी मार्गावर आंब्याने भरलेला ट्रक उलटला; पायदळ व्यक्ती गंभीर जखमी

वर्धा-आर्वी मार्गावरील खरांगणा (मोरांगणा) शिवारात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. मध्यप्रदेशकडे आंबे घेऊन जाणारा ट्रक अचानक उलटल्याने रस्त्यावरून पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक बसली. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात ट्रकचे तसेच मोठ्या प्रमाणात आंब्यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Nashik Live : येवला शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा; नागरिक आक्रमक, शिंदेसेनेचा हंडा मोर्चाचा इशारा

नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेने शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर राजकारण करू नये आणि तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला इशारा देत, नियमित पाणीपुरवठा न झाल्यास शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा गर्भित इशारा दिला आहे.

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल ० रोहा धाराव MIDC तील क्रिडा संकूल येथे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केल सुनेत्रा पवार यांच स्वागत ० ठिकठिकाणी औक्षण करून महिलांनी तर JCB तुन पुष्पवृष्टी करीत सुनेत्रा पवार यांच रोहा शहरात स्वागत

Mumbai Goa Highway मुंबई गोवा महामार्गवरील कासार्डे ब्रिजच्या स्लॅबचा भाग कोसळला

मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे ब्रिजच्या स्लॅबचा काही भाग तुटून खाली पडला आहे. ज्या ठिकाणी हा भाग कोसळला त्या ठीकाणी बॅरीगेट् लावून हा भाग बंद करण्यात आला आहे. मात्र ब्रिजचे काम निकृष्ट झाल्यामुळेच हा स्लॅब कोसळला असल्याचा आरोप होत आहे. सध्या पावसाळा तोंडावर असून या ब्रिजची लवकरात लवकर दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

Pune News गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं नातेवाईकांकडून त्रास, माडगूळकरांच्या नातवाची पोस्ट

गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्याने मला आणि कुटुंबाच्या जीवाला धोका

ग दि माडगूळकर यांचे नातू सुमित्र मांडूळकर यांची फेसबुक पोस्ट करत धोका असल्याची माहिती

ग दि माडगूळकर यांचे पुण्यातील शिवाजीनगर मधील पंचवटी निवास्थान पाडण्यास विरोध करत असल्याने नातेवाईकच त्रास देत असल्याची पोस्ट मध्ये उल्लेख

Gold Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या बाजारात खळबळ

काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करत असल्याने त्याचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत गरज असेल तेव्हाच सोने खरेदी करावे असे पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर आज सराफा बाजारात चर्चेला उधाण आले.

म्हाडा फसवणूक प्रकरण, काजळे आणि पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार

- म्हाडा फसवणूक प्रकरण, काजळे आणि पाटील यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार

- महसूलचे आणखी काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २० टक्के कोट्यात बनावट कागदपत्रांचा वापर

- नाशिक शहरातील ४१ गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठा घोटाळा उघड

Malegaon Live: एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल

नाशिकच्या मालेगावातील माजी महापौर एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांच्याविरोधात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या पवारवाडी व किल्ला पोलिसांनी स्वतंतपणे कारवाई करीत सवंदगाव येथील फॉर्महाऊस व इस्लामबादच्या राहत्या घराजवळील गोदामातून तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 18 गोवंश जनावरे ताब्यात घेतली.दरम्यान घराजवळ कारवाई सुरू असताना मलिक याने शासकीय कामात अडथळा आणत गोवंश जनावरे पळवून लावत फरार झाला आहे.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही जनावरे विक्रीसाठी आणल्याचा पोलिसांना संशय आहे..

Rain in Ratnagiri : वादळी वाऱ्याने आंबा हंगामाला फटका, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू

रत्नागिरी : सोसाट्याच्या वेगवान वाऱ्याने कोकणातील आंबा बागायतदारांची झोप उडाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, मंडणगडसह दापोलीमधील बागायतदारांचा हजारो क्रेट आंबा गळून गेला आहे. त्याची बाजारातील किंमत कवडीमोल झाली आहे. आधीच हंगाम यथातथा असतानाच अस्मानी संकटाने बागायतदारांचे कंबरडे मोडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी हजारो हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Mobile Ban : शेगावला संत गजानन मंदिरात आता मोबाईल बंदी

शेगाव : देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्यासाठी, तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे,गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावे यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाइलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. श्री मंदिर परिसरात मोबाइलचा वापर करताना निदर्शनास आल्यास मोबाईल जप्त करण्यात येणार आहे.

Ashok Kharat : भोंदूबाबा खरातचा ताबा मिळवण्यासाठी ED कडून न्यायालयात अर्ज

भोंदूबाबा खरातचा ताबा मिळवण्यासाठी ED कडून न्यायालयात अर्ज

- न्यायालयाने ED अर्ज मंजूर केल्याची माहिती

- अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातने उभे केलेले साम्राज्य नेमके कशाच्या जोरावर? ED कडून केला जाणार तपास

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. त्या रायगडच्या रोहा शहरात येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याला वेगळं महत्व आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात स्फोटकांमुळे खळबळ

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळूरमधील कार्यक्रमस्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर जिलेटीनच्या दोन कांड्या आढळल्या. मोदी यांचा ताफा जाणार असलेल्या मार्गावरील पदपथावर या कांड्या आढळल्यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

D.Ed. Admission : 'डीएड्' प्रवेशाला आजपासून होणार सुरवात

सोलापूर : इयत्ता बारावीच्या निकालानंतर उद्यापासून (सोमवार) ‘डीएड्’ प्रवेशाला सुरुवात होणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना ४९.५० टक्के, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांनादेखील ‘डीएड्’ प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयांमध्ये तीन हजार रुपये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १२ हजार रुपयांत प्रवेश मिळणार आहे. एक जून रोजी प्राथमिक, तर तीन जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

Himanta Biswa Sarma : आसाममध्ये उद्या हिमंता बिस्व सरमा यांचा शपथविधी सोहळा

गुवाहाटी : आसाममध्ये भाजपप्रणित ‘एनडीए’च्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी हिमंता बिस्व सरमा यांची एकमताने निवड झाली. राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असून, मंगळवारी (ता. १२) शपथविधी होईल. खानापारा येथील व्हेटर्नरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

PM Narendra Modi : देशातील नागरिकांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा अत्यंत काटकसरीने वापर करावा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Latest Marathi Live Updates 11 May 2026 : ‘‘देशातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा अत्यंत काटकसरीने वापर करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद (हैदराबाद) येथे केले. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, ‘कारपुलिंग’ आणि पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.