Suryakumar Yadav yet to reach Dharamsala for IPL match: कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचे मालक नाखुश असल्याच्या बातम्या सुरू आहेत... काहींच्या मते हार्दिकचे कर्णधारपद जाणार आहे, परंतु अद्याप संघाकडून किंवा व्यवस्थापन असा कोणताच विचार करत नसल्याची माहिती समोर आहे. पण, BCCI ने गर्लफ्रेंड पॉलिसी आणल्यामुळे हार्दिक नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. त्यात हार्दिकचे संघासोबत नसणे, अनेक चर्चांना खतपाणी घालत आहेत. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना धर्मशाला येथे होणार आहे आणि रोहित शर्मासह बरेच खेळाडू तेथे दाखलही झाले आहेत. पण, हार्दिकला मुंबईतच थांबवण्यात आले आहे.
पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा बुधवारी पंजाब किंग्सशी सामना होणार आहे, पण हार्दिक पांड्या संघासोबत धर्मशाला येथे गेलेला नाही. मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सोमवारी दुपारी शहरात दाखल झाले, पण कर्णधार दिसला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिकला मागील दोन सामन्यांत खेळता आले नाही. त्याची अनुपस्थिती तो अधिक काळ मैदानाबाहेर राहील याचे संकेत देत आहे. पण, सामन्यापूर्वी संघात सामील होण्यासाठी त्याच्याकडे अजून पुरेसा वेळ आहे.
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्रीमागील सामन्यापूर्वीही हार्दिक संघात उशिरा सामील झाला होता, मात्र तो त्या सामन्यात खेळला नाही. सध्या मुंबईत सपोर्ट स्टाफकडून त्याच्या दुखापतीची तपासणी केली जात आहे आणि त्याच्या तंदुरुस्तीवर व्यवस्थापनाचे बारीक लक्ष आहे. पण, तो उद्या अखेरीस धरमशाला येथे जाऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल उठवल्या जाणाऱ्या चर्चा, या केवळ अफवा आहेत. पण, त्याला या पर्वात साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि ही त्याच्यासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे. आठ सामन्यांमध्ये त्याने १४६ धावा केल्या असून केवळ चार बळी घेतले आहेत.
दरम्यान, सूर्यकुमार यादव देखील धर्मशाला येथे गेलेला नाही आणि त्याची अनुपस्थिती वैयक्तिक कारणांमुळे आहे. तो उद्या धर्मशाला येथे दाखल होण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या गैरहजेरीत सूर्याने टीमचे नेतृत्व सांभाळले आहे. तो रायपूर येथेही उशीराच दाखल झाला होता आणि RCB विरुद्ध नेतृत्व केले होते. धर्मशालातही तसेच घडण्याचा अंदाज आहे.
Craziest Matche : वन डे सामन्यात संघाच्या ८२२ धावा... एक त्रिशतक, एक द्विशतक अन् एक शतक... ७९४ धावांनी विजयमुंबई इंडियन्स सध्या ११ सामन्यांत तीन विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यांचे २० मे रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि २४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध, तसेच बुधवारी रात्री पंजाब किंग्सविरुद्ध होणारे तीन सामने अजून बाकी आहेत.