शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची संबंधित याचिकावर सुप्रीम कोर्टात आज ता. (15) सुनावणी पार पडली. आजच्या या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ठाकरेसेनेचे वकील देवदत्त कामत यांना चांगलेच सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीवेळी वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वातआधी तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नाही असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा असे सारन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटले. तसेच शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होईल, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले.
NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं सुनावणीसाठी आम्ही तयार- देवदत्त कामतउद्धव ठाकरे गटाच्या वतीने हजर असलेले वकील देवदत्त कामत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या सोयीनुसार ते या प्रकरणावर युक्तिवाद करण्यास तयार आहेत. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्हाला युक्तिवाद करायचा नाहीये, तुम्हाला फक्त विधाने करायची आहेत. जेव्हा प्रकरण सुनावणीसाठी घेतले जाते, तेव्हा तुम्ही तारीख निश्चित करायला सांगता. आणि आम्ही तारीख दिली की, हे ठराविक राजकीय नेते अशी विधाने का करत आहेत?
'नीट'मुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, कधी होणार महाटीईटीची परीक्षा? नवी तारीख जाहीरसरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की,न्यायालयया प्रकरणात सर्व पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करते. ॲडव्होकेट कामत यांनी सांगितले की, न्यायालयाला जेव्हा पुरेसा वेळ मिळेल तेव्हा पूर्णवेळ सुनावणीसाठी तारीख निश्चित केल्यास त्यांच्या पक्षाला काहीही अडचण नाही. ते म्हणाले, आम्ही यासाठी उत्सुक आहोत कारण आम्ही गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहोत.
Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास अशी विधाने करण्याचा कोणालाही अधिकार नाहीदुसऱ्या बाजूने शिंदेसेनेचे हजर असलेले वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला न्यायालयाविरुद्ध अशी विधाने करण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या बाजूने असे काहीही करण्यात आलेले नाही.रोहतगी म्हणाले, न्यायालयावर किती ताण आहे हे आम्हाला माहिती आहे. आमच्या बाजूने असे काही झालेले नाही. कोणत्याही बाजूने अशी विधाने केली जाऊ नयेत.