ITI Admission : 'आयटीआय'च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा
esakal May 16, 2026 12:45 AM

पुणे - राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया येत्या गुरुवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू होईल, तर पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया एक जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २१ मे पासून सुरू होत आहे.

राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये २१ मे पासून सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

राज्यातील सर्व शासकीय आणि मान्यताप्राप्त खाजगी आयटीआयमधील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी ‘https://admission.dvet.gov.in’ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी सांगितले.

राज्यातील ‘आयटीआय’बद्दल -

  • शासकीय आयटीआय : ४१९

  • खासगी आयटीआय : ५८८

  • एकूण व्यवसाय अभ्यासक्रम : ८३

  • अभियांत्रिकी गटात एक वर्ष कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम : १८

  • दोन वर्ष कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम : ३७

शासकीय ‘आयटीआय’चे प्रकार -

तपशील : ‘आयटीआय’ची संख्या

  • सर्वसाधारण : ३०७

  • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी : ६१

  • फक्त महिलांसाठी : १५

  • आदिवासी आश्रमशाळांमधील : २८

  • अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी : ०४

  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी : ०२

  • अतिरेकी कारवाईग्रस्त जिल्ह्यातील युवकांसाठी : ०२

  • एकूण : ४१९

प्रवेशासाठी उपलब्ध जागा -

विभाग : शासकीय ‘आयटीआय’ची संख्या : शासकीय आयटीआय’मधील प्रवेशाच्या जागा : खासगी आयटीआयची संख्या : खासगी आयटीआयमधील प्रवेशाच्या जागा : एकूण ‘आयटीआय’ची संख्या : एकूण प्रवेशाच्या जागा

अमरावती : ६३ : १७,३०० : ३५ : ३,९२८ : ९८ : २१,२२८

छत्रपती संभाजीनगर : ८१ : १५,८५६ : ६९ : ८,५०४ : १५० : २४,३६०

मुंबई : ६७ : १६,१९२ : ३९ : ४,५१२ : १०६ : २०,७०४

नागपूर : ७८ : १४,९९६ : १५८ : १४,१८० : २३६ : २९,१७६

नाशिक : ६८ : १५,२२८ : १५१ : १५,४४० : २१९ : ३०,६६८

पुणे : ६१ : १७,५१६ : १३४ : १४,०१२ : १९५ : ३१,५२८

एकूण : ४१८ : ९७,०८८ : ५८६ : ६०,५७६ : १,००४ : १,५७,६६४

पुणे जिल्ह्यातील ‘आयटीआय’मधील प्रवेशाच्या जागा -

तपशील : ‘आयटीआय’ची संख्या : ‘आयटीआय’मधील प्रवेशाच्या जागा

- शासकीय आयटीआय : १६ : ५,५८४

- खासगी आयटीआय : ४६ : ६,८६८

- एकूण : ६२ : १२,४५२

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक -

प्रवेश प्रक्रियेचा तपशील : कालावधी

- ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : २१ मेपासून

- प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्ज स्वीकृती केंद्रात (शासकीय/खासगी आयटीआय) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अज निश्चित करणे : २१ मे पासून

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्य सादर करणे : १ जूनपासून

प्रवेश अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -

- https://admission.dvet.gov.in

- http://www.dvet.gov.in

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.