Budha Nakshatra Gochar: 19 मेपासून या राशींना होणार बक्कळ फायदा, करियरमध्ये नवी उंची गाठाल
Tv9 Marathi May 16, 2026 12:45 AM

Budha Nakshatra Gochar May 2026: ज्योतिषशास्रानुसार १९ मे २०२६ रोजी दुपारी २.३७ वाजता बुध ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतीष मान्यतेनुसार बुध ग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी खूपच शुभ आणि लाभदायक सिद्ध होऊ शकतो. वास्तविक रोहिणी नक्षत्रा खूप शुभ आणि आकर्षक नक्षत्रात गणले जाते. ज्याचा स्वामी चंद्र मानला जातो. अशात जेव्हा बुध आणि चंद्राची ऊर्जा जेव्हा एक साथ प्रभाव टाकते तेव्हा व्यक्तीचे विचार, निर्णय क्षमता, आर्थिक स्थितीवर याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. या वेळी त्या व्यक्तीचे करियर, शिक्षण, व्यापार याच चांगेल सकारात्मक बदल पाहायला मिळतात. चला तर कोणत्या राशींना हा लाभ मिळणार आहेत ते पाहूयात…

वृषभ रास

बुध नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण हा काळ तुमच्यासाठी सकारात्मकता घेऊन येत आहे. यावेळी दीर्घकाळापासून सुरु असलेला आरोग्य समस्या सुधारु शकते. मानसिक तणाव कमी होईल. लाभाचे योग चांगले आहेत. जीवनसाथीच्या सोबत चांगला तालमेल कायम राहिल. खास, म्हणजे ज्यांना नवा व्यापार करायचा असेल तर त्यांना चांगली संधी आहे. कुटुंबातील वातावरण सुखद आणि सहकार्यपूर्ण राहिल. सर्व क्षेत्रात अनुकूल बातम्या येतील. आर्थिक बाबतीत हळूहळू स्थिरता येण्याचे संकेत आहेत.

कन्या रास

कन्या रास असणाऱ्यांना हा काळ नवीन सुरुवात आणि संधींनी भरलेली असू शकते. असे म्हटले जात आहे की नवीन लोकांशी संपर्क बनतील. ज्यांच्या मदतीने काही ना काही महत्वपूर्ण कार्य सुरु करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय जे लोक स्पर्धांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक असेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल आणि तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.मनाजोगता लाभ प्राप्त होण्याची जास्त शक्यता आहे. नोकरी पेशा लोकांना कार्यक्षेत्रात अनुकूलता कायम राहिल.

मकर रास

मकर रास असलेल्यांसाठी बुधाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश आर्थिक प्रकरणात लाभ देणारा सिद्ध होऊ शकतो. धनलाभाच्या नव्या संधी मिळू शकतील. आणि थांबलेली कामात गती येऊ शकते. तुम्हाला कुठूनतरी मनासारखा नोकरीचा प्रस्ताव देखील मिळू शकतो. कोणत्या तरी मंगल समारंभात भाग घेण्याची संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि नेतृत्व क्षमतेत देखील वाढ होऊ शकते. कुटुंबिय तुमच्या प्रेम संबंधांना स्वीकारुन विवाहासाठी तयार होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुरु असलेल्या अडचणी कमी होऊ शकतात आणि नात्यांमध्ये माधुर्य वाढेल.

( डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. येथे दिलेली माहिती आणि तथ्यांची अचूकते संदर्भात टीव्ही ९ मराठी वेबसाईट जबाबदार नाही. )

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.