GT vs CSK Toss : चेन्नईचा गुजरात विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, महेंद्रसिंह धोनी अखेरचा सामना खेळणार?
Tv9 Marathi May 21, 2026 11:45 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने फिल्डिंगचा निर्णय घेत गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानात बॅटिंगची संधी दिली आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

साई किशोर याच्या जागी प्रसिध कृष्णा याचा इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर चेन्नईच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मॅथ्यू शॉर्ट आणि गुरजनप्रीत सिंह या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

चेन्नई-गुजरात दुसऱ्यांदा आमनेसामने

चेन्नई विरुद्ध गुजरात दोन्ही संघांची आयपीएल 2026 स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. गुजरातने याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नई गुजरातचा हिशोब करुन मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शुबमन गिल याची कर्णधार म्हणून कामगिरी

शुबमन गिल याने कर्णधार म्हणून एकूण 39 सामन्यांत नेतृत्व केलं आहे. शुबमनने त्यापैकी 22 सामन्यांत संघाला विजयी केलं आहे. तर शुबमन कर्णधार म्हणून 17 सामन्यांत अपयशी ठरला आहे. शुबमनची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 56 इतकी आहे.

गुजरातची अहमदाबादमधील आकडेवारी

गुजरातने अहमदाबादमध्ये आयपीएल 2025 पासून 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी गुजरातने 8 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. गुजरातची अहमदाबादमधील 2025 पासूनची विजयी टक्केवारी ही 61 टक्के आहे.

महेंद्रसिंह धोनी नाहीच

दरम्यान महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी तरी मैदानात उतरेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र धोनी 14 व्या आणि शेवटच्या सामन्यासाठीही मैदानात उतरला नाही. अशाप्रकारे धोनीला दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमाला दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन: संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट, अंशुल कंबोज, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, मुकेश चौधरी आणि गुरजपनीत सिंग.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशिद खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, अर्शद खान आणि मोहम्मद सिराज.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.