सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
जयदीप मेढे May 23, 2026 02:43 PM

Abhijeet Dipke on Dharmendra Pradhan: देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच अशी संभावना केल्यानंतर देशामध्ये आणि सोशल मीडियामध्ये संतापाची लाट पसरली. यानंतर सोशल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली. या पार्टीने पहिल्यांदा जाहीरनामा प्रसिद्ध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू केली. मात्र, दुसऱ्या बाजूने सोशल मीडियातील कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडिया हँडल एकतर हॅक करण्यात आली किंवा बंद करण्यात आली. इन्स्टा पेज सुद्धा हॅक झालं आहे. या कारवाईनंतर या मोहिमेचा संस्थापक अभिजीत दिपके यांना पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताना हल्लाबोल केला. नव्या भारतात उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याची टीका त्याने ट्विट करत केली. 

ऑनलाइन याचिकेवर 5,68,000 हून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली

अभिजितने ट्विट करत म्हटलं आहे की, पेपर लीकनंतर शिक्षण मंत्र्यांविरोधात कारवाई करायला हवी होती. सरकारच्या अपयशामुळे विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला, पण नव्या भारतात उत्तरादायित्वाची मागणी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी विरोधात कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, नीट घोटाळ्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या उपरोधिक (satirical) मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपकेनं  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे आणि नीट (NEET) परीक्षेतील गोंधळामुळे 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अभिजितने केला आहे. या मोहिमेला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ऑनलाइन याचिकेवर 5,68,000 हून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. अकाउंट ॲक्सेस करता येत नाही. मात्र, वापरकर्त्यांना ते अकाउंट पाहता येत होते, असे अभिजितने ट्विट करत सांगितलं. अभिजितला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनीही आपल्या मुलाच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.