Uday Samant and Neelam Shirke Film Corporation Elections: एकीकडे राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या (All India Marathi Film Corporation) निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेते विजय पाटकर (Actor Vijay Patkar) यांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत (Marathi Film Corporation) राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आणि दमदाटीचे आरोप केले आहेत. तसेच, त्यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरू दिला गेला नाही, असा आरोपही केला आहे. यंदा या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) विरुद्ध मेघराज भोसले (Meghraj Bhosle) अशी लढत दिसून येणार असल्याची चर्चा होती. पण, यावेळी मला निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरू दिला नसल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा ट्वीस्ट आलाय. त्यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि एका मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, राजेभोसले यांनीही पाटकरांवर पलटवार केलाय. अशातच आता विरोधकांनी या निवडणुकीत सुरू असलेल्या धामधुमीसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. तसेच, जोरदार टीकाही केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट करत उदय सामंत (Uday Samant) यांचं आणि त्यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांचं नाव घेत अत्यंत खळबळजनक आरोप केला. "मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. तसेच, भाजपकडून दडपशाही केली जातेय, याचं उत्तम उदाहरण ही निवडणूक आहे, असं म्हणत सुप्रीया सुळे यांनी या निवडणुकीवरुन थेट भाजपवर आरोप केलाय.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. एका मंत्र्याची बायको चित्रपट महामंडळाची निवडणूक लढतेय, मंत्र्यांचा ओएसडी फोन करून धमकावत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच, रोहित पवार यांनीही या निवडणुकीत सुरू असलेल्या धुसफुसीवरुन इशारा दिला आहे. कलाक्षेत्रातील लोकांचा आवाज दाबला जात असले तर आम्ही त्या विरोधात रस्त्यावर उतरू, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
अभिनेते विजय पाटकर यांनी नेमका काय आरोप केलाय? (Vijay Patkar On Meghraj Bhosle)
"माझा आक्षेप मेघराज राजेभोसलेवर आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे मागील 10 वर्ष काय केलं. महामंडळाच अक्षरशः थडग केलं याने. 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगार देखील दिला नाही. उलट मला फोन करतोय आणि म्हणतोय माझा पॅनल मधून उभे रहा. याला लाज कशी वाटत नाही. मी काय माती खाल्ली आहे का? याच्या पॅनलमधून उभं राहायला...", असा आरोप विजय पाटकर यांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर केलाय.
पुढे बोलताना अभिनेते विजय पाटकर म्हणाले की, "मागील 40 वर्ष आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं? निलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊदे पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही..."
मेघराज राजेभोसले यांचा विजय पाटकरांवर पलटवार (Meghraj Bhosle On Vijay Patkar)
अभिनेते विजय पाटकरांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना मेघराज राजेभोसले यांनी म्हटलंय की, "विजय पाटकर हा इंडस्ट्रीतला कलंक, अभिनयामध्ये कच्चा आहे, पण लबाडीमध्ये एक नंबर आहे... एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विजय पाटकर यांनी लोकांना फसवलं, अनुदान देतो म्हणून अनेकांना फसवलं ते आज लोक माझ्याकडे येतात... जनरल बॉडीमधून पळपुटा अध्यक्ष म्हणून विजय पाटकर प्रसिद्ध झाला, चार दिवसांत 60 जणांनी फॉर्म भरलाय, 40 विरोधी पक्षातल्या लोकांनी अर्ज भरलाय... कुठला मंत्री आणि कुठला ओएसडी होता, ज्यानं तुला फॉर्म भरू दिला नाही? याची नावं जाहीर करावी..."
पाहा व्हिडीओ : Meghraj Bhosale Mumbai:विजय पाटकर हा इंडस्ट्रीतला कलंक,अभिनयामध्ये कच्चा, मेघराज भोसलेंच प्रत्युत्तर
ABP माझाच्या बातम्या LIVE...