Dharmendra posthumous Padma Vibhushan: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज २५ मे रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित पद्म पुरस्कार सोहळ्यात हेमा मालिनी यांनी पती धर्मेंद्र यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. या भावनिक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडूनही भावना व्यक्त केल्या जात आहेत.
हेमा मालिनी यांनी अश्रू अनावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळीहेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची मुलगी आहाना देओल देखील उपस्थित होती. वडिलांच्या सन्मानाचा क्षण पाहताना आहाना भावूक होत तिला रडू कोसळले. संपूर्ण देओल कुटुंबासाठी हा क्षण अभिमानासोबतच अत्यंत भावनिक होता. यावेळी हा सन्मान स्विकारताना हेमा मालिनी यांनी अश्रू अनावर झाले.
Ananya Pandey:'साई पल्लवीशी तुझी तुलना होऊच शकत नाही'; भरतनाट्यममुळे अनन्या पांडे ट्रोल, मिम्सचा पाऊसधर्मेंद्र यांचे ३०० हून अधिक चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी धर्मेंद्र यांना हा सन्मान देण्यात आला आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘धरम वीर’, ‘मेरा गांव मेरा देश’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. “ही-मॅन ऑफ बॉलिवूड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरारया कलाकारांचा होणार सन्मान
बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच, मल्याळम चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मम्मुटी यांनाही त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कारकिर्दीसाठी पद्मभूषण प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय, जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पीयूष पांडे यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा देखील आद पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.