Veen Doghatali Tutena Samar Proposal Promo Viral: झी मराठीवरील 'वीण दोघातली तुटेना' (Veen Doghatali Tutena) या मालिकेमध्ये सध्या भरपूर ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्वानंदी आणि समरसह सर्वच पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अभिनेत्री पूर्वा गोखलेची एन्ट्री झाली होती. स्वानंदी आणि समरच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मालिकेत सध्या स्वानंदीला समरबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव झाली असली तरी समरला ही जाणीव व्हायची आहे. पण, आता ही मालिका आणखी रोमँटिक वळण घेणार आहे. समरला स्वानंदी विषयी वाटणाऱ्या प्रेमाची जाणीव होणार असून समर स्वानंदीला ग्रॅन्ड प्रपोज करणार आहे. झी मराठी वाहिनीने यासंदर्भातील एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ही पोस्ट पाहून या मालिकेच्या चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. (Zee Marathi Promo)
वीण दोघातली तुटेना मालिकेत किमयाच्या एक्झिटनंतर प्रेक्षकांना समर - स्वानंदीच्या आयुष्यात रोमँटिक ट्रॅक सुरू होणार आहे. आता समर राजवाडे स्वानंदीला ग्रँड प्रपोज करणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये 'स्वानंदी सकाळी उठते त्यावेळी वर्तमानपत्रात तिला स्वतःचा फोटो छापून आलेला दिसतो. त्यात 'स्वानंदी आज भेटूयात 7.30 वाजता वरळीत ' असं लिहिलेलं असतं. नंतर ती स्कुटी वरून ऑफिसला जात असताना तिला कोणीतरी तिचं लागलेलं होर्डिंग दाखवतं. हे सगळं कोण करताय असा विचार तिच्या मनात चालू असतो. संध्याकाळी साडेसात वाजता जेव्हा ती वरळी सीलिंकवर पोहोचते, त्यावेळी तिचा मोठा फोटो सी लिंकवर पाहायला मिळतो. त्यावर 'आय लव्ह यू स्वानंदी ' असं लिहिलेलं असतं.
हे पाहून अर्थात स्वानंदी खुश होते. तेवढ्यात बाजूने समर राजवाडे तिच्या बाजूला उभे राहतात. आणि म्हणतात 'तडजोडीचं नातं इतकं सुंदर होईल असा कधीच विचार केला नव्हता, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं , थँक्यू स्वानंदी मॅडम ' थँक्यू ऐकून स्वानंदी नाराज होते. तेवढ्यात लगेच समर स्वानंदीला आय लव्ह यू म्हणतो. आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. जून महिन्यात प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर या मालिकेच्या चाहत्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केलाय.