पन्नाशीनंतरही कॅरमवर संघर्ष
Marathi May 27, 2026 01:24 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खेळाला वयाची मर्यादा नसते. वय ही फक्त संख्या असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले जाणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने खयाल ग्रुपने 50 वर्षांवरील कॅरमवीरांसाठी खास स्पर्धेची मेजवानी आणली आहे. येत्या 30 व 31 मे रोजी पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात या ज्येष्ठय़ांच्या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पन्नाशीनंतरही कॅरमचा जोश कायम असलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक मोठी सुवर्णसंधी आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांना संतोष चव्हाण (9769292926) यांच्याशी संपर्क साधता येईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.