SRH vs RR एलिमिनेटर IPL 2026: आयपीएल 2026 चा (IPL 2026) एलिमिनेटर सामना आज खेळवला जाईल. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सामना रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात जो विजयी संघ ठरले, तो गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये भिडेल. (SRH vs RR Eliminator IPL 2026)
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रायन पराग (कर्णधार), दासून शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (विकेटकीपर), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसेन.
स्फोटक फलंदाजीमुळे आधीच मजबूत असलेल्या सनरायझर्स हैदराबादला, राजस्थान रॉयल्सचा सामना करताना 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यापासून सावध राहावे लागेल. स्पर्धेची सुरुवात सनरायझर्ससाठी खडतर होती, पण दुसऱ्या टप्प्यात त्यांना लय सापडली. नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या पुनरागमनाचाही संघाला मोठा फायदा झाला, ज्यामुळे त्यांनी शेवटच्या सातपैकी पाच सामने जिंकले.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबादने 14 सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने 9 सामने जिंकले आहेत. हैदराबादने या हंगामातील दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानला पराभूत केले आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबादने 5-0 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना कठीण बनला आहे. राजस्थानने हैदराबादला शेवटचे 2023 च्या हंगामात पराभूत केले होते.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएल प्लेऑफमध्येही आमनेसामने आले आहेत. 2024 हंगामासाठीचा दुसरा क्वालिफायर सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला. तो सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. त्यापूर्वी, 2013 मध्ये हे दोन संघ एका एलिमिनेटर सामन्यातही खेळले होते. त्या सामन्यात राजस्थानने हैदराबादला 4 विकेट्स राखून पराभूत केले होते.
आणखी वाचा