धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछा
Marathi May 27, 2026 06:25 PM

IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताच्या चुकीच्या नकाशाचा वाद : आयपीएल 2026 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने गुजरात टायटन्सला तब्बल 92 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. धर्मशाळामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 254 धावांचा डोंगर उभारला आणि आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात मोठा स्कोर नोंदवला.

मात्र सामन्यानंतर लेझर लाईट शोदरम्यान मोठा वाद पेटला. ब्रॉडकास्टमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होताच सोशल मीडियावर संतापाचा स्फोट झाला. अनेक चाहत्यांनी “हा शो देशाचा अपमान” असल्याची प्रतिक्रिया दिली, तर काहींनी थेट कारवाईची मागणी केली.

वाद आणखी वाढला कारण ट्रॉफी दाखवताना देखील चुकीचा भारताचा नकाशा दिसल्याचा दावा करण्यात आला. यामुळे चाहते आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनावर निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे, अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माफी किंवा स्पष्टीकरण आलेले नाही. संबंधित व्हिडीओ अजूनही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवर असल्याने चाहत्यांचा संताप अधिक वाढला आहे.

दरम्यान मैदानावर मात्र आरसीबीने अक्षरशः कहर केला. 255 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची टीम फक्त 162 धावांत गारद झाली. गोलंदाजीत जेकब डफीने 3 विकेट घेत गुजरातचा कणा मोडला, तर भुवनेश्वर कुमार, राशिख सलाम आणि क्रुणाल पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेत सामना एकतर्फी केला. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात आरसीबीसमोर गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स यापैकी एक संघ असणार आहे.

हे ही वाचा –

Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.