खादी इंडिया ऑनलाइन शॉपिंग: गेल्या काही वर्षांत देशातील खादी क्षेत्रात (Khadi Sector) अभूतपूर्व प्रगती झाल्याचं दिसून येतंय. या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा थेट ग्राहकांना करून देण्यासाठी आणि खादी उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार आता एक मोठे पाऊल उचलत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार यांनी एक मोठी घोषणा करत सांगितलं की, देशात लवकरच खादी उत्पादनांसाठी एक नवीन, आधुनिक आणि हायटेक ई-कॉमर्स पोर्टल (E Commerce Portal) लॉन्च केलं जाणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात खादी उत्पादनांच्या विक्रीने तब्बल 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर, आता सर्वसामान्य जनतेसाठी ऑनलाईन खरेदीचा एक मोठा आणि दर्जेदार खजाना खुला होणार आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी या आगामी पोर्टलच्या तांत्रिक फीचर्सबद्दल माहिती देताना सांगितले की, हे पोर्टल पूर्णपणे ‘मोबाईल-फर्स्ट’ (Mobile-First) तंत्रज्ञानावर आधारित असेल.
‘शॉप द लुक’ सारखे भन्नाट फीचर्स : या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना उत्पादनांचे हाय-रिझोल्यूशन (High Resolution) फोटो, जलद व सुरक्षित ऑनलाईन पेमेंट सुविधा आणि ‘शॉप द लुक’ (Shop the Look) यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आकर्षक फीचर्स मिळतील.
‘Gen Z’ तरुणांना आकर्षित करण्याचा प्लॅन : या पोर्टलचा मुख्य उद्देश आजच्या आधुनिक तरुण पिढीला म्हणजेच ‘जेन जी’ला (Gen Z) खादीकडे आकर्षित करणे आणि या अस्सल भारतीय ब्रँडची यशोगाथा संपूर्ण जगासमोर मजबूतपणे मांडणे हा आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये खादी उत्पादनांच्या मागणीत प्रचंड आणि ऐतिहासिक वाढ झाली आहे.
विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ : खादी उत्पादनांची विक्री 1 लाख 87 हजार 105 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, 2013-14मध्ये हा आकडा केवळ 31 हजार 154 कोटी रुपये इतकाच होता.
पुढील वर्षाचे लक्ष्य : चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये खादी उत्पादनांची एकूण विक्री 2.51 लाख कोटी रुपयांच्या पार जाण्याची भक्कम शक्यता आयोगाने वर्तवली आहे.
खादी आणि ग्रामोद्योग उपक्रमांमुळे देशातील ग्रामीण भागात रोजगाराची मोठी गंगा वाहताना दिसत आहे.
कोटींच्या घरात रोजगार : वर्ष 2013-14 मध्ये खादी क्षेत्रात एकूण रोजगार 1.30 कोटी इतका होता, जो वर्ष 2025-26 मध्ये वाढून थेट 2.04 कोटी झाला आहे. म्हणजेच, 2013-14 च्या तुलनेत गेल्या काही वर्षांत खादीच्या माध्यमातून कोट्यवधी हातांना रोजगाराच्या नव्या आणि शाश्वत संधी उपलब्ध झाल्या आहेत.
खादी क्षेत्राला बळकट करण्यात ‘पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम’ (PMEGP) या योजनेचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
नवीन उद्योगांची निर्मिती : वर्ष 2025-26 मध्ये या कार्यक्रमांतर्गत देशभरात तब्बल 66 हजार 494 नवीन औद्योगिक युनिट्स (इकाइयां) स्थापन करण्यात आले.
लाखो तरुणांना नोकरी अन् करोडोंची सबसिडी : या नवीन युनिट्सच्या माध्यमातून 7 लाख 31 हजार 434 लोकांना रोजगाराच्या सुवर्णसंधी मिळाल्या आहेत. यासाठी 7 हजार 375 कोटी रुपयांच्या कर्जावर (Loans) सरकारने तब्बल 2 हजार 457 कोटी रुपयांची मार्जिन मनी सबसिडी (Subsidy) लोकांना देऊन थेट आर्थिक मदत केली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा