मुंबईवर ढगांची गर्दी, उपनगरांमध्ये भल्या पहाटे पावसाच्या सरी; पुढील तीन तास महत्वाचे, IMDचा अंदाज काय?
सत्यम सिंह May 31, 2026 09:43 AM

Mumbai Rain : राज्यात कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या  (Rain)सरी कोसळत आहे. तर कुठे तपमानाचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, विलेपार्ले, सांताक्रुज या सर्व भागात पहाटे पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून मुंबईकर उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झाले होते. अशातच आता मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून हैराण झालेले मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, हवामान विभागाकडून आज (दिनांक 31मे 2026 ) पुढील 3 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता असून, सोसाट्याचा वारा ताशी 30-40 किमी वेगाने वाहण्याची दाट शक्यता आहे. परिणामी मुंबई आणि पालघरमध्ये पाऊस कोळण्याची शक्यता वर्तवण्यात असली असून त्या अनुषंगाने खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई हवामान विभागाकडून (Mumbai IMD) करण्यात आल्या आहे.

Monsoon Rain: मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या सरींची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह (Thunderstorm) पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने तेथेही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.