IPL २०२६ चे विजेतेपद 'आरसीबी'ने पटकवले
RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट
RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काने केला भन्नाट डान्स
IPL २०२६ चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)ने पटकवले. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उचलली आहे. काल (३१ मे २०२६ - रविवारी) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. विराटच्या विजयानंतर आरसीबी आणि विराटचे चाहते आनंद उत्सव साजरा करत आहे. RCBने मॅच जिंकताच विराट आणि अनुष्काने स्टेडियमवर सेलीब्रेशन केले. विराटने अनुष्काला फ्लाइंग किस दिला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.
View this post on Instagram
RCB च्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वजण किंग कोहली आणि आरसीबीच्या टीमवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. अशात विराट कोहलीची बायको आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने RCBच्या विजयानंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये RCBचा कोच दिनेश कार्तिक आणि विराटची झलक पाहायला मिळत आहे. फोटोतील विराटच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विराट कोहलीच्या टी-शर्टच्या पुढील बाजूला 'Champions' असं लिहिलेले आहे. तर मागच्या बाजूला 'One Felt Nice, We Did It Twice' असे लिहिले आहे. तसेच पोस्टवर अनुष्काने हार्ट इमोजी शेअर केला आहे. विराट -अनुष्का हे प्रेक्षकांचे आवडते कपल आहे.
Anushka Sharma-virat kohli विराट -अनुष्काचे ग्रँड सेलिब्रेशन
सोशल मीडियावर विराट -अनुष्काचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात RCB च्या विजयानंतर दोघे बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. RCBच्या विजयाची ग्रँड पार्टी झाली त्यात विरुष्काने तुफान डान्स केला. आरसीबीच्या अधिकृत पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात विराट आणि अनुष्का भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.विराटचे डान्स मूव्ह्ज तर एकदम कडक आहेत. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आणि यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?