Dawood Ibrahim : वांद्र्यात मशीद पाडली त्यावरुन..डी गँगचा मोठा प्लान उघड, धुरंधरमुळे बडे साहबला चांगलीच मिर्ची झोंबली
GH News June 01, 2026 05:11 PM

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. यात आयएसआय आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन समोर आलय. पाकिस्तानच्या नापाक हरकतीबद्दल भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हैराण करुन सोडणारा खुलासा केलाय. अलीकडेच धुरंधर चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. या धुरंधर चित्रपटामुळे डी कंपनीचा सर्वेसर्वा दाऊद इब्राहिमला चांगलीच मिर्ची लागली आहे. या चित्रपटात बडे साहब नावाचं एक कॅरेक्टर दाखवलय. चित्रपटात हा बडे साहब आजारी दाखवला असून अंथरुणावर असतो. हा बडे साहब खूप कमजोर दाखवलाय. हा बडे साहब म्हणजे पाकिस्तानात लपून बसलेला दाऊद इब्राहिम आहे. त्यामुळे दाऊदला चांगलीच मिर्ची झोंबली आहे. एनडीटीव्हीन वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटामुळे सगळी डी कंपनी संतप्त आहे. दाऊद इब्राहिम अजूनही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी डी गँग आपली सर्व ताकद लावत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या यशानंतर ‘डी कंपनी’ने मुंबईतील आपलं ग्राऊंड नेटवर्क Active करायला सुरुवात केली आहे. या मिशनसाठी भरतीची जबाबदारी शकील गँगला दिली आहे. ट्रेनिंग आणि दारुगोळा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ISI वर सोपवली आहे. प्लानच्या अमलबजावणीची जबाबदारी मुन्ना झिंगाडवर सोपवली आहे.

खरा प्लान नाही सांगितला

या कारस्थानसाठी मुंबईतून काही गुंडांची निवड करण्यात आली. या प्लानमागचा खरा हेतू त्यांना सांगण्यात आला नाही. पण वांद्रे गरीबनगरमध्ये काही दिवसांपूर्वी एक बेकायद मशीद बुलडोझर लावून पाडण्यात आली. त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, असं सांगण्यात आलं. मशि‍दीच्या मुद्यावरुन माथी भडकवण्यात आली. काही दिवसांपूर्वी वांद्र्यात रेल्वेच्या अतिक्रमण केलेल्या जागेवरील बेकायद बांधकाम हटवण्यात आलं. त्यात ही मशीद सुद्धा होती.

तपास यंत्रणांचा अंदाज काय?

मुंबई अंडरवर्ल्डमधील डी कंपनीची दहशत आता संपली आहे. पैशा उकळण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालय. अशा परिस्थितीत दाऊद आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी ISI च्या मदतीने भारतात एखादा मोठा हल्ला करु शकतो किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला टार्गेट करु शकतो अशी तपास यंत्रणांना भिती आहे. वेळेतच भारतीय यंत्रणांनी काही जणांना अटक केली. त्यामुळे मोठा कट उधळला गेला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.