Raja Shivaji Wins Hindi Audiences: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्टारर आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमानं यशस्वीरित्या पाचव्या आठवड्यात दमदार एन्ट्री केलीये. सिनेमा प्रदर्शित होऊन महिनाभरानंतरही प्रेक्षकांची उत्सुकता (Box Office Collection) कायम आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांतील (Entertainment) मराठी प्रेक्षकांनी सिनेमावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हा सिनेमा 2 भाषेत प्रदर्शित झाला आहे. मराठीसह सिनेमाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, 'राजा शिवाजी' या सिनेमानं पाचव्या आठवड्यात हिंदी आवृत्तीमध्ये किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे रोजी मराठीसह हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या आधीपासून या सिनेमाची प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून, दोन्ही व्हर्जनने चांगली कमाई केली आहे. या सिनेमानं हिंदी व्हर्जनमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
मराठी व्हर्जनमध्ये या सिनेमानं ग्रॉस 82.66 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 70.02 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. हिंदी व्हर्जननेही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात सिनेमागृहांकडे आकर्षित केले आहे. या सिनेमानं हिंदीमध्ये एकूण 29.71 कोटी रुपयांची कमाई केली असून, 25.15 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. यामुळे हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.
मराठी सिनेसृष्टीत 'राजा शिवाजी' या सिनेमानं नाव कमावलं. सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरलाय. हिंदी व्हर्जनमधील कमाई ही या सिनेमासाठी एडिशनल कमाई ठरली. हिंदी आणि मराठी व्हर्जन एकत्र करुन, या सिनेमानं एकूण 95.17 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तर, 112.38 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. तसेच परदेशात या सिनेमानं 4.27 कोटींची कमाई केली आहे. तसेच वर्ल्डवाइड या सिनेमानं 116.65 कोटींचे कलेक्शन केले आहे.
मराठी नेट कलेक्शन - 70.02 कोटी
हिंदी नेट कलेक्शन - 25.15 कोटी
महत्त्वाच्या इतर बातम्या:
स्वामींचा आशीर्वाद... 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर डंका; सोमवार असूनही जमवला कोट्यवधींचा गल्ला
ABP माझाच्या बातम्या LIVE...